शिरगाव- कुसगाव सेवा रस्त्याचे डांबरीकरण करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरगाव- कुसगाव सेवा रस्त्याचे डांबरीकरण करा
शिरगाव- कुसगाव सेवा रस्त्याचे डांबरीकरण करा

शिरगाव- कुसगाव सेवा रस्त्याचे डांबरीकरण करा

sakal_logo
By

सोमाटणे, ता. १९ ः मलमपट्टी न करता पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील शिरगाव ते कुसगाव दरम्यानच्या सेवा रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी भूमाता शेतकरी कृती समितीसह रस्त्यालगतच्या गावांतील ग्रामस्थांनी केली आहे.

द्रुतगती मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यालगतच्या गावांच्या दळणवळणासाठी खडी डांबरीकरणाचा सेवा रस्ता केला जाईल, असे आश्वासन रस्ते विकास महामंडळाने शेतक-यांना दिले होते. या आश्वासनाचे पालन न करता गेल्या दोन दशकानंतरही महामंडळाने सेवा रस्त्याचे खडी डांबरीकरण न करता केवळ माती मुरमाचा रस्ता केला. हा रस्ता दरवर्षी पावसाळ्यात वाहून जात असल्याने दळणवळणासाठी रस्त्यालगतच्या गावांतील नागरिकांना जीव धोक्यात घालून पावसाळ्यातील चार महिने दुचाकीवरून द्रुतगती मार्गाने प्रवास करावा लागतो. या प्रवासात झालेल्या अपघातात अनेक दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागला आहे. रस्त्याच्या खडी डांबरीकरण कामाच्या मागणीसाठी भूमाता शेतकरी कृती समितीसह रस्त्यालगतच्या
गावांतील नागरिकांच्या वतीने अनेकवेळा आंदोलने केल्यानंतरही संबंधित विभागाने दखल घेतली नाही. ही समस्या कायमची सोडवण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने शिरगाव ते कुसगाव दरम्यानच्या सेवा रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी खडी डांबरीकरण करावे, अशी मागणी कृती समितीचे अध्यक्ष सुभाष धामणकर, प्रवीण गोपाळे, विश्वनाथ शेलार, गुलाब घारे, विलास दळवी, संतोष केदारी, कचरू पारखी, डॉ. नीलेश सुऱ्हे आदींसह परंदवडी, उर्से, सोमाटणे, आढे, ओझर्डे, सडवली, बऊर, पिंपळोली, देवले, कुसगाव, औंढे, नांगरगाव आदी गावांतील नागरिकांनी केली आहे.
----------------------------
फोटो-ओझर्डे ः सेवा रस्ता मातीचा केल्याने दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना कसरत करावी लागते.
Smt19Sf1.
------------------------------------------------------------------------------