थकबाकीदार ३१,९७१; थकबाकी ६३१ कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थकबाकीदार ३१,९७१; थकबाकी ६३१ कोटी
थकबाकीदार ३१,९७१; थकबाकी ६३१ कोटी

थकबाकीदार ३१,९७१; थकबाकी ६३१ कोटी

sakal_logo
By

पिंपरी, ता. १४ ःशहरातील पाच लाख ७९ हजारांवर मिळकतींची नोंद महापालिकेकडे आहे. त्यातील ३१ हजार ९७१ मिळकतींचा ६३१ कोटी रुपये करभरणा थकीत आहे. विशेष म्हणजे यातील तीन हजार ८५० जणांनी मालमत्ताकराचा एकदाही भरणा न केलेला नाही. अशा थकबाकीदारांना महापालिकेच्या कर आकारणी व करसंकलन विभागाने जप्तीच्या नोटीस बजावल्या आहेत.

मालमत्ताकर थकबाकीदार
- ५० हजारांपेक्षा अधिक थकबाकीदार ः २६,७६०
- ५ लाखांपेक्षा अधिक थकबाकीदार व्यावसायिक ः १,३६१
- मालमत्ताकराचा एकदाही भरणा न केलेले ः ३,८५०
- जप्तीची नोटीस दिलेले एकूण थकबाकीदार ः ३१,९७१

मालमत्ता व करसंकलन रक्कम
- गेल्या आर्थिक वर्षातील कर संकलन ः ६२५ कोटी रुपये
- चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत करभरणा ः ३०० कोटी रुपये
- एकूण मालमत्ता कराची थकबाकी ः ६३१ कोटी रुपये
- चालू आर्थिक वर्षात करसंकलन उद्दिष्ट ः १ हजार कोटी रुपये

कससंकलनासाठी महापालिकेचे प्रयत्न
- माझी मिळकत माझी आकारणी योजना
- महिन्याच्या शेवटच्या शनिवारी करसंवाद सभा
- १७ विभागीय करसंकलन कार्यालयांची सुविधा
- तीन टप्प्यात जप्तीची कारवाई करणार

तीन टप्प्यांत जप्तीची कारवाई
- पहिला टप्पा ः पाच लाखांपेक्षा अधिक व्यावसायिक थकबाकीदार १,३६१
- दुसरा टप्पा ः मालमत्ताकराचा एकदाही भरणा न केलेले ३,८५०
- तिसरा टप्पा ः ५० हजार रुपयांवरील थकबाकीदार २६,७६०

करसंकलन कार्यालयनिहाय थकबाकीदार
कार्यालय / थकबाकी रक्कम (कोटी रुपयांत)
चिखली / २०९
वाकड / १४६
भोसरी / १२८
फुगेवाडी / ११७
आकुर्डी / ११२
चिंचवड / १०५
थेरगाव / १००

करसंकलन विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह आग्रही आहेत. एक हजार कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. सर्व मिळकतधारकांनी लवकरात-लवकर कर भरून महापालिकेला सहकार्य करावे.
- नीलेश देशमुख, सहाय्यक आयुक्त, कर संकलन व कर आकारणी विभाग, महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y24904 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..