गणेश मंडळांचे मंडप रस्त्यावरच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेश मंडळांचे मंडप रस्त्यावरच
गणेश मंडळांचे मंडप रस्त्यावरच

गणेश मंडळांचे मंडप रस्त्यावरच

sakal_logo
By

पिंपरी, ता. १४ : गणपती मंडळांनी जोरदार वाजत-गाजत गणेश विसर्जन मिरवणूक काढली. दहा दिवसांच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर मंडळांच्या कार्यकर्त्यांची मरगळ गेलेली दिसत नाही. अद्यापही, नवव्या दिवशी विसर्जन मिरवणुकीनंतरचे देखावे, मंडप रस्त्यावर ‘जैसे थे’ आहेत. भोसरी, दिघी, आळंदी, मोशी, स्पाइन रोड या मार्गावरील मंडप रस्त्यावर असल्याने वाहतुकीला अडसर निर्माण होत असल्याचे चित्र समोर आले आहे.
शहरात कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर गणेशोत्सव जोरदार साजरा झाला. तर, दुसरीकडे मिरवणुकाही डीजेवर उत्साहात झाल्या. परंतु, गणेश मंडळाचे टोलेजंग देखावे, मंडप अद्याप रस्त्यावर आहेत. मंडपवाल्याचे काहींचे पैसे चुकते करणे बाकी आहेत. जोरदार पावसामुळे काहींनी मंडप हटविलेले नाहीत. पावसात मंडप सोडणारी मंडळी आलेली नाहीत. बऱ्याच जणांना गाडी भाडे देण्यात आले नव्हते. काही मंडळांची देणगी देखील यावर्षी कमी प्रमाणात वसूल झाली होती. त्यामुळे, याचा परिणाम मिरवणुकीनंतर मंडप आणि देखावे काढण्यावरही झाला.
बऱ्याच मंडळांनी पाचव्या व सातव्या दिवशीच्या विसर्जनानंतर मंडळाचे तंबू हटविले. मात्र, मंडपासाठी घेतलेले खड्डे बुजविले नाहीत. सांगवी, पिंपळेगुरव, थेरगाव, रहाटणी, वाकड, दिघी या भागातील खड्डे बुजविलेले नाहीत. त्यामुळे, डांबरी रस्त्यांची वाट लागली आहे. त्यामध्ये, काही ठिकाणी माती भरल्याचे दिसले. परंतु, पावसाच्या पाण्यानी माती वाहून गेली. तर, बऱ्याच जणांनी खड्डे न घेता डेकोरेशनसाठी बांबू उभे केले होते. मंडळाच्या बांबू, दोऱ्या, कापड, तसेच, निर्माल्य रस्त्यावर पडले होते. काही ठिकाणी पत्रे रस्त्यावर उभे केले आहेत. त्यामुळे, अपघाताचा धोका उद्भवण्याची शक्यता आहे.
नव्वद टक्के गणेश मंडळांनी रस्त्यावरच मंडप उभे केले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा चांगलाच बोजवारा उडाला होता. निगडी, आकुर्डी प्राधिकरण भागात मंडळांनी खड्डे विरहित मंडप उभारले. मात्र, ज्यांनी मंडपासाठी खड्डे केले आहेत. अशा गणेश मंडळावर कारवाई होणे अपेक्षित आहे. अन्यथा, गणेश मंडळानी पाडलेले खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

‘‘महापालिकेने मंडळांना दिलेल्या मुदतीत मंडप हटविणे गरजेचे आहे. आमच्या कर्मचाऱ्यांना सांगून वाहतुकीला अडचण निर्माण झाल्यास कारवाई करण्यात येईल.’’
- आनंद भोईटे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड वाहतूक विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y24934 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..