महापालिका शाळा ब्रँडिंगसाठी कोट्यवधींच्या खर्चाला मंजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका शाळा ब्रँडिंगसाठी 
कोट्यवधींच्या खर्चाला मंजुरी
महापालिका शाळा ब्रँडिंगसाठी कोट्यवधींच्या खर्चाला मंजुरी

महापालिका शाळा ब्रँडिंगसाठी कोट्यवधींच्या खर्चाला मंजुरी

sakal_logo
By

पिंपरी, ता. १४ ः महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी बोधचिन्ह, घोषवाक्य, नाव व एकसारखे दिशादर्शक चिन्हाचे फलक लावण्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला जाणार आहे. त्याला महापालिका सभेत आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
महापालिकेच्या शाळांसाठी दरवर्षी रंगरंगोटी, दुरुस्ती काम, शाळेची स्वच्छता, कर्मचाऱ्यांचे वेतन आदींवर वारेमाप खर्च केला जात आहे. महापालिकेच्या माध्यमिक विभागाच्या १८ शाळा आहेत. प्राथमिक विभागाच्या ११० शाळा आणि २०७ बालवाड्या असे एकूण ३१७ शाळा आहेत. या सर्व शाळांसाठी बोधचिन्ह, घोषवाक्य नाव व एकसारखे दिशादर्शक चिन्हाचे फलक लावण्यात येणार आहे.
शाळेजवळील रस्त्यावर ‘पीसीएमसी पब्लिक स्कूल’ असे नामफलक लावण्यात येणार आहेत.‘ज्ञानमेव शक्ती’ हे घोषवाक्य असणार आहे. सर्व शाळेशेजारच्या रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत. प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय, मुलामुलींचे स्वच्छतागृह असे एकाच आकाराचे व एकाच रंगसंगतीचे विविध चिन्हांचे फलक लावण्यात येणार आहेत. त्यासाठी कोट्यवधींचा खर्च अपेक्षित आहे. त्याला महापालिका आयुक्तांनी सर्वसाधारण सभेत मान्यता दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y25064 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..