हवा प्रदूषण व आरोग्याबाबत आशा स्वयंसेविकांना प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हवा प्रदूषण व आरोग्याबाबत
आशा स्वयंसेविकांना प्रशिक्षण
हवा प्रदूषण व आरोग्याबाबत आशा स्वयंसेविकांना प्रशिक्षण

हवा प्रदूषण व आरोग्याबाबत आशा स्वयंसेविकांना प्रशिक्षण

sakal_logo
By

पिंपरी, ता. १५ ः वातावरणातील बदलाचा मानवी आरोग्यावर परिणाम होतो. विशेषतः लहान मुले, महिला, वृद्ध नागरिकांना अधिक जपावे लागते. या बदलाची व त्याचे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची माहिती त्यांना होणे आवश्यक आहे. हे काम ‘आशा’ स्वयंसेविका पद्धतशीरपणे करू शकतात, असे मत आरोग्य विभागाचे वरिष्ठ संशोधन अधिकारी डॉ. रितू परचुरे यांनी व्यक्त केले. ‘हवचे प्रदूषण आणि त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम’ विषयावर वायसीएम रुग्णालयाच्या चाणक्य सभागृहात आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. महापालिका रुग्णालये व दवाखान्यांतर्गत असलेल्या १५० आशा स्वयंसेविका सहभागी झाल्या होत्या. अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना गडलिंकर, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. चैताली इंगळे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y25329 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..