लॉजमधील रखवालदाराला मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लॉजमधील रखवालदाराला मारहाण
लॉजमधील रखवालदाराला मारहाण

लॉजमधील रखवालदाराला मारहाण

sakal_logo
By

पिंपरी, ता. १५ : लॉजमध्ये आलेल्या सहा जणांच्या टोळक्याने पोलिस असल्याची बतावणी करून लॉजमधील रजिस्टर तपासले. तसेच तेथील रखवालदाराला मारहाण केल्याचा प्रकार दिघी येथे घडला. या प्रकरणी राम अरुण काळे (रा. आळंदी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रल्हाद रामदास तांदळे (वय ३४, रा. गुंजाळ वस्ती, वारजे माळवाडी), छाया प्रल्हाद खैरनार (वय ३७), प्रथमेश राजेश जोशी (वय २०), विजय विद्यानंद धोत्रे (वय १९). अंकिता विद्यानंद धोत्रे (वय २२, सर्व रा., रा. सिंहगड रोड, जाधवनगर, पुणे) यांच्यासह एका अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी हे फिर्यादीच्या देहूफाटा येथील योगीराज लॉज येथे आले. पोलिस असल्याची बतावणी करून लॉजमधील रजिस्टर तपासले. तेथील लोकांकडे चौकशी करून रखवालदार मधुकर मोहटे यांना मारहाण केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y25406 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..