महापालिकेच्या रुग्णालयातील भरणा वाढला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेच्या रुग्णालयातील 
भरणा वाढला
महापालिकेच्या रुग्णालयातील भरणा वाढला

महापालिकेच्या रुग्णालयातील भरणा वाढला

sakal_logo
By

पिंपरी, ता. १६ ः महापालिकेच्या सर्व रुग्णालये आणि दवाखान्यातील वैद्यकीय सेवा सुविधा आणि औषधोपचाराच्या दरात वाढ केल्यानंतर रुग्णालयांतील भरणा वाढला आहे. जुलै महिन्यात ७९ लाखांचा भरणा झाला होता. तर, ऑगस्ट महिन्यात १ कोटी २४ लाखांचा भरणा झाला असून जुलैच्या तुलनेत ४५ लाखांनी भरणा वाढला आहे.

महापालिकेचे आठ रुग्णालये आणि २९ दवाखान्यांमधून शहरातील तसेच शहराच्या हद्दीबाहेरील रुग्णांना उपचारार्थ आरोग्य सेवा सुविधा पुरविल्या जातात. महापालिका प्रशासकांनी दवाखाने, रुग्णालयातील दरवाढीचा निर्णय घेतला. शासन दरानुसार निर्धारित केलेले दर महापालिकेच्या सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांकरिता १ ऑगस्टपासून २०२२ लागू केले आहेत. जे रुग्ण केशरी शिधापत्रिकाधारक आहेत आणि ‘महात्मा फुले जन आरोग्य’ योजनेमध्ये बसत नाहीत, अशा रुग्णांकडूनही शासनाकडील दरानुसार दर आकारणी केली जाते.

अतिदक्षता विभाग (आयसीयू), साइड रूम, सेमी प्रायव्हेट रूमच्या दरात मोठी वाढ केली आहे. नवीन दरांची १ ऑगस्टपासून अंमलबजावणी सुरू झाली. तर, तांत्रिक कारणामुळे संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयात १७ ऑगस्टनंतर अंमलबजावणी सुरू झाली होती. रुग्णालयांचा जुलै महिन्यात ७९ लाख २ हजार २१७ रुपयांचा भर झाला होता. नवीन दर लागू झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात १ कोटी २४ लाख ४० हजार ६२१ रुपयांचा भरणा झाला. जुलै महिन्याच्या तुलनेत ४५ लाख ३८ हजार ४०४ रुपयांनी भरणा वाढला आहे.

कोट
‘‘महापालिका रुग्णालयांमध्ये १ ऑगस्टपासून शासन दरानुसार निर्धारित केलेले दर आकारले जात आहेत. राज्यभरात सर्वांत चांगली वैद्यकीय सुविधा पिंपरी-चिंचवड महापालिकेची आहेत. वैद्यकीय सुविधांच्या दरामध्ये जास्तीची वाढ झालेली नाही. नागरिकांनी याकडे सकारात्मकपणे बघावे आणि सहकार्य करावे.’’
- डॉ. लक्ष्मण गोफणे, वैद्यकीय विभागप्रमुख, महापालिका
---------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y25534 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..