जळगाव येथील पोलिस निरिक्षक बकाले यांना बडतर्फ करा ः काळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव येथील पोलिस निरिक्षक 
बकाले यांना बडतर्फ करा ः काळे
जळगाव येथील पोलिस निरिक्षक बकाले यांना बडतर्फ करा ः काळे

जळगाव येथील पोलिस निरिक्षक बकाले यांना बडतर्फ करा ः काळे

sakal_logo
By

पिंपरी, ता. १६ : मराठा समाजाचा अपमान केल्याप्रकरणी पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यावर पोलिस प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. मात्र ही कारवाई तात्पुरती असून त्याबाबत मराठा समाज नाखूषच आहे. संबंधित पोलिस निरिक्षकाला शासनाच्या सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बकाले पोलिस प्रशासनाच्या जबाबदार पदावर आपले कर्तव्य बजावीत होते. राज्यासह देशातील कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राखण्याची जबाबदारी ही पोलिस प्रशासनाची असते. मात्र या जबाबदार पदावरील अधिकारीच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे वक्तव्य करत असल्यास ते खेदजनक आहे. मराठा समाज शांतताप्रिय समाज आहे. मराठा आरक्षणाच्या मागण्यांवेळी संपूर्ण देशाला समाजाने आंदोलनाचा आदर्श घालून दिलेला आहे. मात्र जाणीवपूर्वक कोणी अपमान करत असेल तर त्या देशद्रोही मनोविकृतीला त्याच भाषेत उत्तर देखील देण्याची कुवत मराठा समाजामध्ये आहे. अशा विचारांची लोक समाजात तेढ निर्माण करण्यास कारणीभूत ठरतील. या मागणीची दखल घेऊन त्वरित पोलिस निरिक्षक बकाले याला बडतर्फ करावे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ३११ अन्वये एखाद्या शासकीय अधिकाऱ्यांनी केलेले वक्तव्य समाजामध्ये शांतता भंग आणि कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण करून जातीय तेढ निर्माण करणे हे भारतीय घटनेच्या विरोधी आहे. यासाठी अशा अधिकाऱ्यांना नोकरी मधून कायमस्वरूपी काढून टाकण्यात यावे. अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y25655 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..