पिंपरीत पूर्वीच्या वादातून तिघांचा राडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरीत पूर्वीच्या वादातून तिघांचा राडा
पिंपरीत पूर्वीच्या वादातून तिघांचा राडा

पिंपरीत पूर्वीच्या वादातून तिघांचा राडा

sakal_logo
By

पिंपरी, ता. १६ : पिंपरीतील गुरुनानक मार्केट येथे तिघांनी पूर्वीच्या वादातून तरुणाला कोयता व तलवारीने मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणाने वार चुकवून आरोपींच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर आरोपींनी कोयता, तलवार हवेत भिरकावत ‘कोणी आडवा आला तर त्याला आडवा करू’ अशी धमकी देत शिवीगाळ, आरडाओरडा केला. कोयता, तलवारीने वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत माजवली.
या प्रकरणी विकास बिहारी राम (रा. रिव्हर रोड , पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पी.डी. उर्फ प्रेम डोंगरे (वय १८, रा. मिलिंदनगर, पिंपरी) व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी (ता. १४) दुपारी अडीचच्या सुमारास फिर्यादी हे पिंपरीतील फॅन्सी फूट वेअर या दुकानात कामावर असताना आरोपी डोंगरे त्याच्या दोन साथीदारांसह तेथे आला. पूर्वीच्या वादातून फिर्यादीला मारण्याच्या उद्देशाने कोयता व तलवार घेऊन त्यांच्या अंगावर धावून गेले. फिर्यादीला कोयता मारत असताना त्यांनी वार चुकवला असता डोक्याला घासून गेला. त्यानंतर तलवारीने दोन वेळा वार केले असता फिर्यादीने चुकवले. फिर्यादी त्यांच्या तावडीतून निसटल्यामुळे आरोपींनी त्यांच्या हातातील कोयता व तलवार भिरकावून तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. जर कोणी आडवा आला तर त्याला आडवा करतो असे म्हणत मोठ्याने शिवीगाळ करीत होते. तलवार व कोयते तेथील गाड्यांवर मारत होते. त्यामुळे परिसरातील लोक सैरावैरा पळू लागले. दुकानदारांनी दुकाने बंद केली. आरडाओरडा करीत काही वेळाने आरोपी तेथून निघून गेले. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y25766 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..