बारावीनंतरच्या करिअरच्या दिशा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारावीनंतरच्या करिअरच्या दिशा
बारावीनंतरच्या करिअरच्या दिशा

बारावीनंतरच्या करिअरच्या दिशा

sakal_logo
By

पिंपरी, ता. १६ ः बारावीनंतर इंजिनिअरिंगला जायचे किंवा आर्किटेक्चरमध्ये करिअर करायचे? विद्यार्थ्यांच्या मनात कायम हा संभ्रम असतो. तसाच पालकांनाही आपल्या पाल्याच्या बारावीनंतरच्या करिअरविषयी अनेक शंका, प्रश्‍न भेडसावत असतात. या प्रश्‍नांचे उत्तर देण्यासाठी ‘सकाळ विद्या’ आणि पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ यांच्यातर्फे रविवारी (ता. १८) विनामूल्य चर्चासत्राचे आयोजन केले आहे. या चर्चासत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळणार आहे.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी साडेआठ वाजता चर्चासत्राला सुरुवात होईल. विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत प्रवेशासाठी अर्ज करताना विद्यार्थी व पालकांना अनेक प्रश्‍न असतात. प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन कशी होईल? प्रवेशाच्या किती व कशा फेऱ्या होतील? प्रवेश प्रक्रिया कधीपर्यंत चालेल? महाविद्यालये कधी सुरू होणार? याबाबत सविस्तर मार्गदर्शन चर्चासत्रात मिळेल. इंजिनीअरींगनंतरच्या रोजगाराच्या संधी’ या विषयावर तज्ज्ञ डॉ. शीतलकुमार रवंदळे बोलतील. तसेच ‘बारावीनंतरचे करिअर’ यावर विजय नवले हे मार्गदर्शन करतील. आर्किटेक्चरमधील करिअर, प्रवेश व कॉलेज पर्यायावर डॉ. महेंद्र सोनवणे बोलतील.

चर्चासत्राला प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य असेल. कोणत्या शाखेत जायचे, हे निश्‍चित असले तरी सीईटी किंवा जेईईच्या गुणांच्या (पर्सेंटाईल) आधारे कॉलेजची प्राथमिकता कशी ठरवावी, त्यासाठी ‘ऑप्शन फॉर्म’ कसा भरावा, योग्य कॉलेजची निवड कशी करावी, याची माहिती मिळणार असल्याने विद्यार्थी व पालकांचा ऑनलाइन प्रवेश अर्ज भरताना गोंधळ होणार नाही. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स (पीसीएम) विषयांमध्ये ४५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी गुण असतील तर कोणते पर्याय उपलब्ध आहेत? त्याचबरोबर शैक्षणिक कर्ज, कटऑफ, स्कॉलरशिप व डिप्लोमानंतर इंजिनिअरिंगची दुसऱ्या वर्षाची प्रवेशप्रक्रिया आणि प्रवेशासाठी आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता, बारावीनंतर उपलब्ध संधी व कॉलेजचे पर्याय या विषयांवर प्रा. केतन देसले मार्गदर्शन करतील. प्रवेश प्रक्रियेसंबंधी विद्यार्थी व पालकांच्या शंकाचे निरसन चर्चासत्रातून होईल.


चर्चासत्रातील वक्ते व विषय
- विजय नवले ः बारावीनंतरचे करिअर
- डॉ. शीतलकुमार रवंदळे ः इंजिनीअरिंगनंतरच्या रोजगाराच्या संधी
- प्रा. केतन देसले ः प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक कर्ज, कटऑफ, स्कॉलरशिप
- डॉ. महेंद्र सोनवणे ः आर्किटेक्चरमधील करिअर, प्रवेश व कॉलेज पर्याय

कधी, केव्हा, कुठे?
कधी : रविवार, ता. १८ सप्टेंबर
केव्हा : सकाळी ८.३० वाजता
कुठे : प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड
अधिक माहितीसाठी संपर्क ः ९८८१९०७२५२
---

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y25779 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..