नेतृत्व विकासावर कार्यशाळेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेतृत्व विकासावर 
कार्यशाळेचे आयोजन
नेतृत्व विकासावर कार्यशाळेचे आयोजन

नेतृत्व विकासावर कार्यशाळेचे आयोजन

sakal_logo
By

पिंपरी, ता. १७ : रांजणगाव येथील व्हील इंडिया कंपनी युनियन लीडर व मनुष्यबळ विभागासाठी ‘नेतृत्व विकास व मानवी संबंध’ या विषयावर दोन दिवसाची कार्यशाळा झाली. कार्यशाळेत मार्गदर्शक ट्रेनर, औद्योगिक क्षेत्रातील विविध व्यक्ती तसेच कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांनी विविध विषयांवर विचार मांडले.
हिताची अष्टमो फाय प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष सुधीर गोगटे म्हणाले, ‘‘जपानकडून झिरो डिफेक्ट, स्क्रॅप, डाऊन टाइम, अपघात अशा पद्धतीने वेळेवर काम करणे हा मूलमंत्र आहे. तर, भारत औद्योगिक क्षेत्रात अव्वल ठरेल. आपण कामात व वैयक्तिक जीवनात येणाऱ्या समस्यांवर रोज दहा मिनिटे शांत बसून अंतर्मनाची साथ घेतली. तर, सर्व समस्यांचे उत्तर सापडते.’’
व्हिल्स इंडिया ग्रुपचे कॉर्पोरेट मनुष्यबळ विकास विभागाचे अधिकारी बाबू म्हणाले, ‘‘सर्वांनी एकत्र येऊन विचार केला तर, ग्राहकांना कमी दरात उत्पादन देऊन कमी असलेला नफा वाढवू शकतो.’’ प्रॉडक्शन मॅनेजर देसले म्हणाले, ‘डाऊन टाइम व स्क्रॅप कमी केला तर, उत्पादन क्षमता वाढवता येते.’

मोटिवेशनल ट्रेनर व गुणवंत कामगार दत्ता धामणस्कर म्हणाले, ‘‘युनियन म्हणजे फक्त पगार वाढ हा पारंपारिक दृष्टिकोन आता बदलला पाहिजे. बदलत्या काळाप्रमाणे कामगारांचे जीवनमान उंचवण्यासाठी, बदलाला सामोरे जाण्यासाठी त्यांच्यात सकारात्मक भावना निर्माण करण्यासाठी सातत्याने लीडर्सने कामगारांशी संपर्क ठेवला पाहिजे.’’

निखिला शिरोडकर म्हणाले, की कामगारांनी व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. निरनिराळ्या केस स्टडीज, रोल प्ले, स्लाईड शो, ग्रुप ऍक्टिव्हिटी याद्वारे नेत्तृत्व व मानवी संबंध एकमेकांना पूरक घटक आहेत, हे सांगायला हवे.

मनुष्यबळ विभागाचे प्रमुख संजय वाळे म्हणाले, ‘कंपनी व युनियनमध्ये अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत. अधिक सकारात्मक भूमिकेतून काम करू.’ युनियन अध्यक्ष गोरक्ष शिंदे, सेक्रेटरी किशोर पवार यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y26051 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..