निगडीतील उड्डाणपुलाखाली अतिक्रमण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निगडीतील उड्डाणपुलाखाली अतिक्रमण
निगडीतील उड्डाणपुलाखाली अतिक्रमण

निगडीतील उड्डाणपुलाखाली अतिक्रमण

sakal_logo
By

पिंपरी, ता. १७ ः निगडीमधील कै. मधुकर पवळे उड्डाणपुलाखाली काही व्यावसायिकांनी अतिक्रमण करत, त्या ठिकाणी ‘खाऊ गल्ली’ सुरू केली आहे. हा प्रकार गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. विशेष म्हणजे या उड्डाणपुलापासून महापालिकेचे ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय काही मीटरवर आहे. तरी देखील एकाही अधिकाऱ्यांनी कारवाई केली नसल्याचे दिसून येत आहे. याउलट, क्षेत्रीय कार्यालयांनी हद्दीवरून वाद उत्पन्न करत कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे.


शोभीकरण करून विद्रूपीकरण...!
पवळे उड्डाणपुलाच्या सुशोभीकरणासाठी वर्षभरापूर्वी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. या माध्यमातून पालखीतील वारकऱ्यांची विविध रूपे अगदी हुबेहूबरित्या पुलाखाली रेखाटण्यात आलेली आहेत. यातून निगडीच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. यासाठी महापालिकेला तब्बल एक कोटी रुपयांच्या आसपास खर्च आला आहे. परंतु अलीकडेच काही व्यावसायिकांनी या पुलाखाली अतिक्रमण करत त्या ठिकाणी खाद्य पदार्थांचे गाड्या थाटल्या आहेत. तर काहींनी त्या ठिकाणी टपऱ्या टाकून भाड्याने देण्याचा प्रकार सुरू आहे. या टपरीधारक सिलिंडर वापरतात, एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अनेक जण रस्ता ओंलाडून खरेदीसाठी जात असल्याने अपघात संभवतो. दरम्यान, निगडी उड्डाणपुलाखाली ‘खाऊ गल्लीच’ उभारायची होती तर मग सुशोभीकरणासाठी महापालिकेने खर्च का केला असावा? असा प्रश्‍न सर्वसामान्य निगडीकरांच्या मनात उपस्थित होत आहे.

संरक्षक भिंतींची तोडफोड
महापालिकेने उड्डाणपुलाखाली बांधलेल्या संरक्षक भिंती सर्रासपणे तोडल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. संरक्षक भिंती तोडून तेथून मार्ग तयार केला आहे. परंतु या प्रकाराकडे महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक काना डोळा करीत आहे. त्यामुळे निगडीतील कै.मधुकर पवळे उड्डाणपूल कुणाची खासगी मालमत्ता आहे का? असा प्रश्‍न सुज्ञ नागरीकांना पडला आहे. बीआरटीएसचे उपअभियंता चंद्रशेखर धानोरकर यांनी आम्ही पुलाखाली टपऱ्या टाकण्यास परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाचे प्रशासन अधिकारी सीताराम बहुरे यांनी आम्ही परवानगी दिली नसल्याचे सांगितले आहे.
फोटो ः 92094

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y26070 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..