गुन्हे वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त
गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

sakal_logo
By

भोसरीत छळाला कंटाळून
पत्नीची आत्महत्या

पिंपरी, ता. १७ : पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याची घटना भोसरी एमआयडीसीतील बालाजीनगर झोपडपट्टी येथे घडली. अंजूषा पुट्टे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे वडील संजीवकुमार मोहनराव वल्लापे (रा. मरकल, ता. बिदर, कर्नाटक ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती आकाश चंद्रकांत पुट्टे (वय २६, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी, भोसरी) याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी पतीने दारू पिऊन वेळोवेळी पत्नीला मारहाण करून मानसिक व शारीरिक छळ केला. त्याला कंटाळून अंजूषा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
--------------------------

पिंपरीत गुगल पे द्वारे रोकड काढून घेतली

पिंपरीतील वल्लभनगर येथे पादचारी तरुणाला बेदम मारहाण करून जबरदस्तीने दुचाकीवरून घेऊन गेले. मोबाईल ताब्यात घेऊन गुगल पे द्वारे जबरदस्तीने दोन हजार रुपये काढून घेऊन चोरटे पसार झाले.
याप्रकरणी सुयश प्रमोद पाटील (रा. वल्लभनगर, पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानुसार तीन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास फिर्यादी हे यशवंतराव चव्हाण रुग्णालयाकडे (वायसीएमएच ) जाणाऱ्या रस्त्याने पायी जात होते. दरम्यान, तिघांनी त्यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या डोळ्याला दुखापत करून जिवे मारण्याची धमकी दिली. जबरदस्तीने दुचाकीवरून नेवून फिर्यादीचा मोबाईल ताब्यात घेतला. गुगल पे द्वारे जबरदस्तीने दोन हजार काढून घेत पसार झाले. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
---------------------

गांजा बाळगल्याप्रकरणी महिलेला अटक

बेकायदेशीररीत्या गांजा बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका महिलेला अटक केली. ही कारवाई भोसरी एमआयडीसीतील बालाजीनगर झोपडपट्टी येथे करण्यात आली. या महिलेकडून २१ हजार ३७५ रुपये किमतीचा गांजा जप्त केला. हा गांजा आनंद उर्फ अप्पा काळे (रा. परंडा रोड, कुरूडवाडी, जि . सोलापूर) याच्याकडून विकत आणला असल्याचे महिलेने सांगितले. भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
----------------------

निगडीत सात लाखांची घरफोडी
निगडीतील प्राधिकरण येथे किचनच्या खिडकीच्या काचा काढून घरात शिरलेल्या चोरट्याने सात लाखांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे. अज्ञात दोन चोरटे किचनच्या खिडकीचे लोखंडी ग्रील व काचा काढून घरात शिरले. बेडमरूमधील लाकडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, मोत्याचे दागिने, दोन घड्याळ असा एकूण सहा लाख ९० हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
----------------

विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा

अश्लील वर्तन करीत तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी पुरुषोत्तम नागेश गुलिमी (वय ४०) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या कॉलनीत राहणाऱ्या आरोपीने त्यांना अश्लील मेसेज केले. वारंवार
फिर्यादीसमोरून जोरात गाडीत चालवून मोठ्याने गाडीचा हॉर्न वाजवायचा. फिर्यादीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार
रावेत येथे घडला.
-----------------------------
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी प्रदीप केशव गित्ते (रा. मु. पो. नंदगौळ, ता. परळी, बीड) याच्यावर गुन्हा
दाखल झाला आहे . याप्रकरणी पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी व आरोपी यांची मैत्री होती. त्याचे रूपांतर प्रेमात झाले. लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने फिर्यादीवर वेळोवेळी अत्याचार केला.
-----------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y26073 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..