आरोग्यावरील पोस्टर स्पर्धेत दादामहाराज विद्यालय प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्यावरील पोस्टर स्पर्धेत
दादामहाराज विद्यालय प्रथम
आरोग्यावरील पोस्टर स्पर्धेत दादामहाराज विद्यालय प्रथम

आरोग्यावरील पोस्टर स्पर्धेत दादामहाराज विद्यालय प्रथम

sakal_logo
By

पिंपरी, ता. १७ : मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाच्यावतीने सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त ‘चाला आरोग्य कमवा-बसा आरोग्य गमवा’ या विषयावर पोस्टर प्रदर्शन स्पर्धेत श्री दादामहाराज विद्यालय आणि न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग संयुक्त विजेते ठरले. स्पर्धेच्या अंतिम फेरीचा निकाल नुकताच लागला. पहिला नंबर विभागून दिला. या गटांचे नेतृत्व अनुक्रमे अनिशा साळुंखे आणि अवधूत शिंपी यांनी केले.

या पोस्टर प्रदर्शन स्पर्धेतून चालण्याचे महत्त्व व बसेपणा न करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यासाठी स्वतः सर्वजणांनी तसे वागण्याचे ठरवले. त्यामुळेच पोस्टर प्रदर्शन प्रभावी ठरले. शहरीकरणामुळे पर्यावरणात मोठा फरक पडून जीवनशैली बदलत आहे. शरीरश्रम कमी झाल्यामुळे शारीरीक आणि त्यातून मानसिक आजार समाजात वाढत आहेत, असे अवधूत शिंपी यांनी सांगितले. तिसरा क्रमांक दि स्मार्ट आरट किड्स यांना तर, श्री सरस्वती माध्यमिक विद्यालय आकुर्डी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

दुसरा क्रमांक बाल शिक्षण मंदिर आणि न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग यांच्या गटांना मिळाला. स्पर्धा परीक्षक प्रा. नीता शहा आणि सुरेश शेट्ये यांनी काम बघितले. यावेळी विनय र. र. शशी भाटे, वैशाली कामत, तेजस लिमये, विविध शाळांमधील, विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक, शिक्षक उपस्थित होते. या प्रदर्शनात भाग घेतल्यामुळे पाल्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंना वाव मिळाला, असे पालकांनी बोलून दाखवले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y26105 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..