प्रॉपर्टी कार्डवर सोसायटीचे नाव आवश्यक जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव यांची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रॉपर्टी कार्डवर सोसायटीचे नाव आवश्यक
जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव यांची माहिती
प्रॉपर्टी कार्डवर सोसायटीचे नाव आवश्यक जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव यांची माहिती

प्रॉपर्टी कार्डवर सोसायटीचे नाव आवश्यक जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव यांची माहिती

sakal_logo
By

पिंपरी, ता. १७ ः एखाद्या सोसायटीचे कन्व्हेयन्स डीड झाले तरी जोपर्यंत प्रॉपर्टी कार्डवर सोसायटीचे नाव येत नाही, तोपर्यंत कायदेशीरदृष्ट्या इमारतीवर सोसायटीची पूर्णपणे मालकी होत नाही. त्यासाठी तीन ते चार टप्प्यांची प्रक्रिया पूर्ण करावी लागते, असे प्रतिपादन जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव यांनी शनिवारी (ता. १७) चिंचवड येथे केले.
चिंचवड येथील एस. के. एफ. एम्प्लॉईज हॉल येथे ‘मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेयन्स), सोसायट्यांचा पुनर्विकास, वाहनतळ (पार्किंग), सोसायटी देखभाल’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आघाव बोलत होते. यावेळी सहकारी संस्था पुणे शहर ३ चे उपनिबंधक नवनाथ अनपट-भोसले, महाराष्ट्र राज्य सरकारचे सहकार खाते ॲड. प्रज्ञा पाटील, महापालिकेचे उपअभियंता विजय भोजने उपस्थित होते.
आघाव म्हणाले, ‘‘मालमत्ता सोसायटीच्या नावाने व्हायला हवी. सोसायटीच्या नावे असलेले वीज देयक, महापालिकेचे पाणी देयक हे दुय्यम पुरावे आहेत. त्यासाठी प्रॉपर्टी कार्डवर जोपर्यंत नाव येत नाही, तोपर्यंत मालमत्ता सोसायटीच्या नावावर होत नाही. एखाद्या इमारतीला पूर्णत्वाचा दाखला नसला तरी मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेयन्स) करता येते. मालमत्ता बांधकाम व्यावसायिकाच्या नावे असल्याने अशा मालमत्तेवर काही बांधकाम व्यावसायिकांनी कर्ज काढल्याच्या घटना घडल्या आहेत. सोसायटी स्थापन झाल्यावर चार महिन्यात कन्व्हेयन्स डीड व्हायला हवे. तंटामुक्त सोसायटी योजनेचा लाभ घेण्यासाठी उपनिबंधकांच्या कार्यालयात सोसायटीने केवळ एक अर्ज द्यावयाचा असतो. पण तो अर्जसुद्धा अनेक सोसायट्या देत नाहीत.''''

‘भाडेपट्टा करार’ या विषयी अनपट-भोसले म्हणाले, ‘‘कन्व्हेयन्स डीड करण्यासाठी अनेक सोसायट्या पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे अशा कार्यक्रमांचे आयोजन करावे लागते. पिंपरी-चिंचवडमध्ये भाडेपट्टा तत्त्वावर जागा देऊन मोठ्या प्रमाणात घरे बांधलेली आहेत. भाडेपट्टा करार आणि कॉन्व्हेयन्स डीड या दोन्ही बाबी जवळपास सारख्याच आहेत. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण आता बरखास्त झाले आहे. त्यामुळे आता तेथील रहिवाशांना आता इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी महापालिकेशी संपर्क साधावा लागणार आहे.''''

पार्किंग संदर्भात नागरिकांनी इमारतीचा मंजूर आराखडा यासह अन्य आवश्यक कागदपत्रांसह एखाद्या वास्तुरचनाकार मार्फत आमच्याशी संपर्क साधावा. शहरात माणसे कमी आणि वाहने जास्त झाली आहेत. त्यामुळे अनेक सोसायट्यांमध्ये पार्किंगवरून वाद होतात, असे भोजने यांनी नमूद केले. पंकज थोरात यांनी सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्रिलोक बागूल यांनी आभार मानले.
- -------
फोटो ः 92137

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y26135 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..