ध्येय निश्चितीनंतर निवडा विद्याशाखा जीईई, सीईटी दिलेल्या विद्यार्थ्याना तज्ज्ञांचा सल्ला; चर्चासत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ध्येय निश्चितीनंतर निवडा विद्याशाखा
जीईई, सीईटी दिलेल्या विद्यार्थ्याना तज्ज्ञांचा सल्ला; चर्चासत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद
ध्येय निश्चितीनंतर निवडा विद्याशाखा जीईई, सीईटी दिलेल्या विद्यार्थ्याना तज्ज्ञांचा सल्ला; चर्चासत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद

ध्येय निश्चितीनंतर निवडा विद्याशाखा जीईई, सीईटी दिलेल्या विद्यार्थ्याना तज्ज्ञांचा सल्ला; चर्चासत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद

sakal_logo
By

सकाळ विद्या ः लोगो

पिंपरी, ता. १८ ः बारावीनंतर आपल्याला काय करायचंय? कोणत्या विद्याशाखेतून पदवी घ्यायची आहे? कोणत्या विषयात करिअर करायचंय, हे ध्येय अगोदर निश्चित करा आणि नंतरच विद्याशाखा निवडा, असा सल्ला बारावीनंतर जीईई, सीईटी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांनी तज्ज्ञांनी दिला. निमित्त होते, ‘सकाळ विद्या’ आणि पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ यांच्यातर्फे रविवारी (ता. १८) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित विनामूल्य चर्चासत्राचे...
बारावीनंतर इंजिनिअरिंगला जायचंय, आर्किटेक्चरमध्ये करिअर करायचंय, प्लेसमेंटच्या संधी आदी प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आयोजित चर्चासत्राला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारी संचालक प्रा. डॉ. गिरीश देसाई, डॉ. पुरूषोत्तम वाढजे, डॉ. विलास देवतारे आदी उपस्थित होते. ‘सकाळ’च्या कार्यकारी संपादक शीतल पवार व सहयोगी संपादक जयंत जाधव यांनी स्वागत केले. ‘इंजिनीअरींगनंतरच्या रोजगाराच्या संधी’ या विषयावर तज्ज्ञ डॉ. शीतलकुमार रवंदळे, ‘बारावीनंतरचे करिअर’ या विषयावर विजय नवले, आर्किटेक्चरमधील करिअर, प्रवेश व कॉलेज पर्यायावर डॉ. महेंद्र सोनवणे आणि शैक्षणिक कर्ज, कटऑफ, स्कॉलरशिप व डिप्लोमानंतर इंजिनिअरिंगची दुसऱ्या वर्षाची प्रवेशप्रक्रिया आणि प्रवेशासाठी आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता, बारावीनंतर उपलब्ध संधी व कॉलेजचे पर्याय या विषयांवर प्रा. केतन देसले व प्रा. तुषार गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थी व पालकांच्या शंकांचे निरसनही त्यांनी केले.

प्रलोभने टाळा ः प्रा. नवले
प्रा. विजय नवले म्हणाले, ‘‘आधी ध्येय निश्चित करा. त्यानुसार शाखा निवडा. सिव्हील इंजिनिअरिंगमध्ये संधी आहे. प्रलोभनांच्या मागे लागू नका. देशाची आर्थिक स्थिती पाहता आपण तंत्रज्ञानाच्या आधारावर जगावर राज्य करू, अशी स्थिती भविष्यात दिसते आहे. सोलर व न्युक्लियर विषयातही संधी आहेत. जेईई, सीईटीच्या निकालाच्या गुणवत्ता यादीची काळजी करू नका. शाखा व महाविद्यालयांच्या आपल्या पसंतीनुसार यादी कागदावर तयार करा. अर्ज भरताना चांगले पर्याय निवडा. महाविद्यालय व विषयांचे पसंतीक्रम व्यवस्थित भरा. त्यांचा प्राधान्यक्रम अचूक ठरवा. प्रशासकीय सेवेत जायचे असल्यास, त्या अनुषंगाने शाखा निवडा. विद्यार्थी व पालकांनी समन्वय ठेवा. राष्ट्रनिर्मितीसाठी तरुणांची भूमिका महत्त्वाची असल्याने संशोधन व उद्योग क्षेत्रातील वाटा निवडा.’’

आर्किटेक्चर चांगली संधी ः डॉ. सोनवणे
डॉ. महेंद्र सोनवणे यांनी ‘आर्किटेक्चरमधील करिअर, प्रवेश व कॉलेज पर्याय’ विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘अभियांत्रिकीबरोबरच आर्किटेक्चरलासुद्धा खूप मोठी संधी वर्तमान व भविष्यात आहे. आपल्या आजूबाजूला अनेक बांधकामे होत आहेत. वेगवेगळे प्रकल्प सुरू आहेत. प्रत्येकासाठी वेगवेगळे डिझाईन्स आहेत. आपण एखाद्या ठिकाणी फिरायला जातो किंवा पर्यटनाला जातो. त्यावेळी तेथील बांधकामाचे नमुने पाहतो. तेथील डिझाईन बघतो. तेही एक आर्किटेक्चरचेच नमुने असतात. त्याआधारे किंवा त्यापेक्षा वेगळे डिझाईन आपण करू शकतो. त्यामुळे भविष्यामध्ये आर्किटेक्चर इंजिनिअरला चांगली संधी आहे. आर्किटेक्चर इंजिनिअरिंग ही शाखा चांगल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ शकते.’’

काळजीपूर्वक भरा प्रवेशअर्ज ः प्रा. देसले
प्रा. केतन देसले यांनी प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक कर्ज, कटऑफ, स्कॉलरशिप आदी विषयांवर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘नुकताच सीईटी व जेईई निकाल लागला. आता प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. प्रवेश अर्ज सध्या ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे. शुल्कही ऑनलाईनच भरायचे आहे. त्यासाठी किमान पात्रता बारावी ४५ टक्क्यांनी उत्तीर्ण व सीईटी गुण महत्त्वाचे ठरणार आहेत. गुणपत्रक, जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, छायाचित्रांच्या स्पष्ट दिसतील, अशा प्रतिमा सबमिट करायच्या आहेत. त्यानंतर सर्व कागदपत्रांची तपासणी होईल. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेत पात्र ठरतात. नंतर मेरीट लिस्ट लागते. त्याशिवाय विद्यापीठ, जात, लिंग यानुसार आरक्षण ठरून प्रवेश निश्चित ठरत असतो. त्यासाठी प्रवेश अर्ज काळजीपूर्वक भरावेत.’’

कागदपत्रांची पूर्तता ठेवा ः प्रा. गायकवाड
प्रवेशासाठी आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता, बारावीनंतर उपलब्ध संधी व कॉलेजचे पर्याय या विषयांवर प्रा. तुषार गायकवाड म्हणाले, ‘‘सीईटी निकालानंतर प्रवेशासाठी कालावधी दिला जातो. या कालावधीत कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. त्यांची तपासणी अर्थात व्हेरिफिकेशन होते. त्यानंतर गुणवत्ता यादी लागते. विद्यापीठ, महाविद्यालय, विद्याशाखा, विषय, बारावी व सीईटीचे गुण, जातीचा संवर्ग, लिंग यानुसार अंतिम गुणवत्ता यादी लागते. ऑपशन अर्ज भरायचा आहे. कोर्स निवडायचा आहे. विद्यापीठ निवड करावी लागेल. कॉलेज निवडण्यासाठी जिल्हा निवडावा लागेल. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान महिनाभराचा कालावधी लागतो. त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे काळजी करू नको. अर्ज व्यवस्थित भरा.’’

प्लेसमेंटची क्वॉलिटी बघा ः डॉ. रवंदळे
डॉ. शीतलकुमार रवंदळे म्हणाले, ‘‘विद्याशाखा व कॉलेज काळजीपूर्वक निवडा. उद्योजक होण्याचे ध्येय ठेवा. ज्या कॉलेजला अॅडमिशन घ्यायचे, त्यातील सिनिअर किंवा माजी विद्यार्थ्यांना भेटा. त्यांचा फिडबॅक घ्या. टिचिंग स्टाफची माहिती घ्या. कारण, शिक्षकांच्या ज्ञानावर विद्यार्थी घडत असतात. प्लेसमेंट क्वॉलिटी आणि क्वांटिटी बघा. कॉम्प्युटर आणि आयटी एकसारखे आहेत. त्यांचा अभ्यासक्रम जवळपास समान आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरमुळे करियरची संधी आहे. प्रॅक्टिकल व प्रोग्रामिंग ज्ञान घ्या. एंट्रन्शिप करा. ऑनलाईन कोर्सही करा. चांगल्या मित्रांत राहून वेळ सत्कारणी लावा. अॅप्टिटूड, टेक्निकल, कम्युनिकेशन, प्रोग्रामिंग स्किल ट्रेनिंग महत्त्वाचे आहेत. इंग्रजी बोलण्याचे स्किल वाढवा. कारण, सर्व इंटरव्ह्यू इंग्रजीत होतात. टेक्निकली स्ट्रॉंग व्हा.’’
----
फोटो ः 92273, 92271

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y26317 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..