गुन्हे वृत्त खरेदी केलेला प्लॉट न देता ग्राहकांची तीन कोटींची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त
खरेदी केलेला प्लॉट न देता 
ग्राहकांची तीन कोटींची फसवणूक
गुन्हे वृत्त खरेदी केलेला प्लॉट न देता ग्राहकांची तीन कोटींची फसवणूक

गुन्हे वृत्त खरेदी केलेला प्लॉट न देता ग्राहकांची तीन कोटींची फसवणूक

sakal_logo
By

पिंपरी, ता. १९ : प्लॉट खरेदी करण्यासाठी ग्राहकांकडून पैसे घेतले. मात्र, बुक केलेला प्लॉट नावावर न करता तसेच त्याचे पैसेही परत न करता तीन कोटी ६ लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार हिंजवडी येथे घडला.

याप्रकरणी तेजस सॅमसन गायकवाड (रा. उत्तमनगर, किवळे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार साईरंग डेव्हलपर्सचे मालक के. आर. मलिक, शाहरुख मलिक, नंदिनी कोंढाळकर व इतर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व त्यांच्या सोबतचे प्लॉटधारक यांनी आरोपींना सन २०१२ ते २०१९ या कालावधीत हिंजवडीतील साईरंग डेव्हलपर्स येथे व इतर ठिकाणी हिंजवडी परिसरात प्लॉट घेण्यासाठी पैसे भरले. परंतु, साईरंग डेव्हलपर्स यांनी फिर्यादीने बुक केलेला प्लॉट अथवा बुक केलेल्या प्लॉटचे पैसे परत दिले नाही. फिर्यादीसह त्यांच्या सोबतच्या इतर प्लॉट धारकांची मिळून एकूण तीन कोटी ६ लाख ९ हजार रुपयांची फसवणूक केली.
-----------------

फसवणूकप्रकरणी दोघांवर गुन्हा

कंपनीत पैसे गुंतविण्यास भाग पडून ते पैसे परत न देता फसवणूक केल्याप्रकरणी रवीकुमार संगानी (रा. नेढेनगर, काळेवाडी), पृथ्वी ऊर्फ परविंदर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी निखिल रमनिकलाल चोटालिया (रा. वारजे) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी फिर्यादी यांना क्यूनेट कंपनीत आठ लाख ११ हजार रुपये गुंतविण्यास भाग पाडले. त्यानंतर हे पैसे परत न देता त्यांची फसवणूक केली. हा प्रकार कल्याणीनगर, पुणे व बाणेर येथे घडला.
----------------------

सूसमध्ये अपघातात तरुणाचा मृत्यू

सूस येथे भरधाव दुचाकीच्या अपघातात अभिषेक नवनाथ कदम (वय २३, रा. लक्ष्मी हाईट्स, हिंजवडी) या तरुणाचा मृत्यू झाला तर दुचाकीचालक शुभम संजय कांबळे (वय २३, रा. जानकीनगर, कोथरूड) हा जखमी आहे. रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास अभिषेक व शुभम हे दुचाकीवरून बेंगलोर-मुंबई महामार्गाने जात होते. सूसखिंड येथे दुचाकीला अपघात झाल्याने मागच्या सीटवर बसलेल्या अभिषेकचा मृत्यू झाला तर शुभम जखमी आहे.
---------------
भोसरी,रहाटणीत घरफोडीच्या दोन घटना

भोसरी व रहाटणीत घडलेल्या घरफोडीच्या दोन वेगवेगळ्या घटनेत चोरट्यांनी पाच लाख ८० हजारांचा ऐवज लंपास केला.
भोसरीतील घटनेप्रकरणी कुंडलिक बबनराव पिंपरकर (रा. शिवज्योत कॉलनी, दिघी रोड, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे गावी गेलेले असताना त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून चोरटा घरात शिरला. सोने-चांदीचे दागिने व दोन लाख २० हजारांची रोकड असा एकूण तीन लाख ७० हजारांचा ऐवज लंपास केला तर रहाटणीतील घटनेप्रकरणी किरण विजयकुमार शिंदे (रा. शिवराजनगर, रहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे शनिवारी सायंकाळी पत्नीसह त्यांच्या मुलाला आणण्यासाठी डांगे चौक येथे गेले होते. दरम्यान, दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून चोरटा घरात शिरला. हॉलमधील लाकडी कपाटातून दोन लाख १० हजारांचे सोन्याचे दागिने व दीड हजारांची रोकड असा एकूण दोन लाख ११ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरला. पोलिस अधिक तपास करीत
आहेत.
---------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y26741 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..