गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवाचे वेध गरबा अन् दांडिया प्रशिक्षण शिबिराचे मोठ्या प्रमाणावर आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवाचे वेध

गरबा अन् दांडिया प्रशिक्षण शिबिराचे मोठ्या प्रमाणावर आयोजन
गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवाचे वेध गरबा अन् दांडिया प्रशिक्षण शिबिराचे मोठ्या प्रमाणावर आयोजन

गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवाचे वेध गरबा अन् दांडिया प्रशिक्षण शिबिराचे मोठ्या प्रमाणावर आयोजन

sakal_logo
By

पिंपरी, ता. १९ ः गणेशोत्सवानंतर आता सर्वांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. काळेवाडी, चिंचवड, पिंपरीगाव, शाहूनगर, पूर्णानगर चिखली मोशी-जाधववाडीसह आजूबाजूच्या परिसरात इच्छुकांकडून गरबा अन् दांडिया प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सोसायट्या, उद्यान, सभागृह अशा ठिकाणी ही शिबिरे भरविण्यात आली असून, या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून केला जात आहे. बक्षिसाची लयलूट यंदाच्या नवरात्रोत्सवात पाहायला मिळणार आहे.

गणपती उत्सवानंतर आता भक्तांना देवीच्या आगमनाचे वेध लागले आहेत. शहरात मोठ्या उत्साहात नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येतो. नवरात्र घटस्थापना २६ सप्टेंबरला आहे. तेव्हापासून नऊ दिवस मोठ्या भक्तीभावात देवीची पूजा करण्यात येते. दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतर यंदा देवीचा उत्सव जल्लोषात साजरा करणार आहे. शहरामधील विविध देवींच्या मंदिरांमध्ये तयारीला सुरवात झाली आहे. स्वच्छता, रंगरंगोटी आदी कामे जोरात सुरू आहेत. पारंपरिक गरबा नृत्य आणि दांडिया यांची तरुणी व महिलांना प्रचंड आवड आहे. कितीही व्यस्त असल्या तरी संपूर्ण नवरात्री दांडिया कार्यक्रमांना त्या आवर्जून जातातच. गेल्या काही वर्षांपासून कॉलनी सोसायट्यांमध्येही दांडिया कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केले जातात. अगदी मुलांनाही या खेळाचा मोह सुटत नाही. आपला प्रभाग आणि त्यातील सोसायट्यांना फोकस करून प्रशिक्षण शिबिर भरविले जात आहेत.


गरबा, दांडियाचे प्रशिक्षण वर्ग सुरू
दोन वर्षांनंतर यंदा गरबा, दांडियावर निर्बंध नाहीत. त्यामुळे गरबा, दांडियाचे क्लास सुरू झाले. गरबा दांडिया शिकवताना इच्छुकांचीही सोसायटीत एंट्री होत आहे. अनेक सभागृह, मंदिरात सायंकाळच्या वेळेत तरुणाई, महिला गरब्यांच्या गीतांवर ताल धरताना दिसत आहेत. त्यामुळे इच्छुकांना आता रास दांडियाचे वेध लागले आहेत. प्रशिक्षण शिबिर घेऊन उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्यास आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले आहेत. यंदा आयोजकांकडूनही दांडिया, गरबा महोत्सवाची तयारी सुरू आहे. दरवर्षी मोजक्या ठिकाणी घेण्यात येणारा गरबा अन् दांडिया आता सर्वत्र पाहायला मिळणार आहे. बक्षिसांची लयलूट यंदाच्या नवरात्रोत्सवात पाहायला मिळणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y26777 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..