अतिक्रमणांमुळे झाकोळले पदपथ; पादचाऱ्यांची गैरसोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिक्रमणांमुळे झाकोळले 
पदपथ; पादचाऱ्यांची गैरसोय
अतिक्रमणांमुळे झाकोळले पदपथ; पादचाऱ्यांची गैरसोय

अतिक्रमणांमुळे झाकोळले पदपथ; पादचाऱ्यांची गैरसोय

sakal_logo
By

पिंपरी, ता. १९ ः अतिक्रमणांमुळे पदपथ दिसत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे, असे अतिक्रमण काढावेत, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची प्रक्रिया अधिक गतिमान करावी, अशा स्वरुपाच्या ८३ तक्रारी व सूचना महापालिका जनसंवाद सभेत सोमवारी नागरिकांनी मांडल्या.
नागरिक व प्रशासनात सुसंवाद राहावा, तक्रारींचे निवारण जलदगतीने व्हावे, यासाठी महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा झाली. त्यात शहरात अनेक ठिकाणी सांडपाणी वाहिन्या तुंबल्यामुळे पाणी रस्त्यावर येत आहे, त्यामुळे दुर्गंध पसरून आरोग्यास धोका निर्माण होत आहे. वेळोवेळी ड्रेनेज वाहिन्या दुरुस्त कराव्यात. वीजपुरवठा सतत खंडित होत आहे, त्यासाठी विद्युत यंत्रणा अधिक सक्षम करावी. शहरात ठिकठिकाणी स्थळदर्शक, दिशादर्शक फलक लावावेत. असे फलक झाडांच्या फांद्यांमुळे झाकले जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. धोकादायक वृक्षांची छाटणी करावी. रस्त्यांची दुरुस्ती करावी. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम जलद गतीने पूर्ण करावे. पाणीपुरवठा पुरेशा दाबाने करावा. अवैध नळ जोडणी घेणाऱ्यांवर कारवाई करावी. नव्याने पदपथ तयार करावेत. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी. रस्त्यांच्या बाजूने पथदिवे लावावेत, अशा सूचना व तक्रारींचा समावेश होता. अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभांच्या अध्यक्षपदी अनुक्रमे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, संजय कुलकर्णी, सतीश इंगळे, उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, अजय चारठाणकर, प्रशांत जोशी होते. क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सीताराम बहुरे, विजयकुमार थोरात आदी उपस्थित होते.
--

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y26875 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..