`यिन’च्यावतीने पुस्तकदान शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

`यिन’च्यावतीने 
पुस्तकदान शिबिर
`यिन’च्यावतीने पुस्तकदान शिबिर

`यिन’च्यावतीने पुस्तकदान शिबिर

sakal_logo
By

पिंपरी, ता. २१ ः ‘सकाळ’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क - पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी यांच्यावतीने आयोजित ‘एक पुस्तक देशासाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून ‘पुस्तक दान’ शिबिर घेण्यात आले.
या उपक्रमाच्या माध्यमातून वाचनाची आवड असलेल्या अनेक गरजू लोकांपर्यंत, अनाथालयातील मुलांपर्यंत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोचविण्यासाठी ‘पुस्तके दान करा’ असा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयांनी आणि ‘सकाळ ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ च्या (यिन) पिंपरी चिंचवड विभागाने उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद लाभला. ऐतिहासिक, चरित्रात्मक, आत्मचरित्र, बालसाहित्य, वैचारिक आदी विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तके या उपक्रमाच्या माध्यमातून संकलित करण्यात आली.
प्राचार्य डॉ. एम. जी. चासकर, उपप्राचार्य डॉ. बी. जी. लोबो, यिन समन्वयक अक्षय बर्गे व प्राध्यापकांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे नियोजन शशी चतुर्वेदी, काजल यादव, धारा राठोड, ऋषीकेश मगर, सार्थक हुले, चेतन कसबे, गोविंद देशमुख, प्रतिक्षा कोरे, आरती साळवे, ऐश्‍वर्या शहा व चेतन लिम्हण यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y27246 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..