पिंपरी कोरोना स्थिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी कोरोना स्थिती
पिंपरी कोरोना स्थिती

पिंपरी कोरोना स्थिती

sakal_logo
By

पिंपरी, ता. २० ः गणेशोत्वसापूर्वी, उत्सवकाळ आणि उत्सनानंतरच्या दहा दिवसांचा विचार केल्यास कोरोना तपासणीसाठी आलेल्या संशयित रुग्णांची संख्या घटली आहे. मात्र, संसर्ग झालेल्यांची संख्या किंचित वाढली असून रुग्णालयात दाखल असलेल्यांची संख्या अवघी दहा आहे.
कोरोना संसर्ग व लॉकडाउनमुळे गेले दोन वर्ष गणेशोत्सवावर निर्बंध होते. यंदा निर्बंधमुक्त उत्सव साजरा झाला. गेल्या दोन वर्षांचा अनुभव बघता उत्सव व दसरा, दिवाळी अशा सणांनंतर रुग्णसंख्या वाढली होती. त्यामुळे यंदाही रुग्णसंख्या वाढणार की काय, अशी भिती व्यक्त केली जात होती. मात्र, उत्सवापूर्वीचे दहा, उत्सवाचे दहा आणि उत्सवानंतरच्या दहा दिवसांची आकडेवारी बघता संसर्ग थोडा वाढली असली तरी रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या फारसी नसल्याचे दिसते. तपासणी केलेले संशयित व सक्रीय रुग्णांची संख्या निम्म्याने घटलेली आहे. गणेशोत्सव ३१ ऑगस्टपासून सुरू झाला होता. त्यापूर्वीच्या दहा दिवसांत आठ हजार १५५ जणांची तपासणी केली होती. तर, उत्सवाचा शेवटचा दिवस नऊ सप्टेंबर होता. त्यानंतरच्या दहा दिवसांत तीन हजार ७१ व्यक्तींची तपासणी केली. या दोन्ही कालावधीत अनुक्रमे ७२१ व ४२२ जणांना संसर्ग झाल्याचे आढळले. शिवाय, उत्सवापूर्वी सक्रीय रुग्ण ४५७ होते. सध्या त्यांची संख्या ४०६ आहे. यातील केवळ १० जण रुग्णालयात दाखल असून ३९६ जण गृहविलगीकरणात आहेत.
---

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y27282 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..