‘डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट’च्या अध्यक्षपदी शहाजीराव भड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट’च्या 
अध्यक्षपदी शहाजीराव भड
‘डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट’च्या अध्यक्षपदी शहाजीराव भड

‘डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट’च्या अध्यक्षपदी शहाजीराव भड

sakal_logo
By

पिंपरी, ता. २१ ः देशातील साखर कारखानदारी, सहवीज निर्मिती, इथेनॉल आणि उपपदार्थ निर्मिती क्षेत्रात काम करणारी पुण्यातील डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशनच्या (इंडिया) अध्यक्षपदी शहाजीराव भड यांची निवड झाली. त्यांनी ‘असोसिएशन’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एस. एम. गंगावती यांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात आला.
साखर निर्मिती मशिनरी कारखानदार शेठ वालचंद हिराचंद यांच्या कुशल नेतृत्वाखाली व अध्यक्षतेखाली १९३६ मध्ये डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन या संस्थेची स्थापना झाली. आज संस्था जगभरात पोहोचली असून, दोन हजारांवर सभासद आहेत. तिच्या अध्यक्षपदी पुण्यातील एस. एस. इंजिनिअर्सचे संस्थापक शहाजीराव भड यांची निवड झाली आहे. उत्कृष्ट इंजिनिअर, संशोधक, कल्पक डिझायनर, यशस्वी कारखानदार अशी त्यांची ओळख आहे. साखर व उपपदार्थ निर्माण करणाऱ्या यंत्र निर्मितीत ते ४७ वर्षे कार्यरत आहेत. आजपर्यंत त्यांच्या कंपनीने नवीन ४४ साखर कारखान्यांची निर्मिती व उभारणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. त्यांनी निर्माण केलेल्या ३५० पेक्षा जास्त ऊस गाळपासाठीच्या मिल्स, १०० पेक्षा जास्त बॉयलर व २७० पेक्षा जास्त सेंट्रीफ्युगल मशिन्स देश-विदेशात कार्यरत आहेत. साखर कारखाने, सहवीज निर्मिती, इथेनॉल आणि उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांचे जनरल मॅनेजर, वर्क्स मॅनेजर, चीफ इंजिनिअर्स, कुशल अभियंते, प्रॉडक्शन मॅनेजर, चीफ केमिस्ट असे तंत्रज्ञ, कार्यकारी संचालक, सीईओ असे उत्तम व्यवस्थापक, संशोधक व शेतीनिष्ठ शेतीतज्ज्ञ ‘डेक्कन’ संस्थेचे सभासद आहेत. साखर आणि उपपदार्थ निर्मिती क्षेत्राला नवा आयाम व उंची देण्याचे कार्य संस्था अविरतपणे करत आहे.
--
फोटोः 92877

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y27471 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..