सण-उत्सव काळात महिला सुरक्षेबाबत उपाययोजना करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सण-उत्सव काळात महिला 
सुरक्षेबाबत उपाययोजना करा
सण-उत्सव काळात महिला सुरक्षेबाबत उपाययोजना करा

सण-उत्सव काळात महिला सुरक्षेबाबत उपाययोजना करा

sakal_logo
By

पिंपरी, ता. २२ : पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य नागरिक, महिलांच्या सुरक्षेबाबत आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला असून, पोलिस प्रशासनाने सण-उत्सव काळातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील लोकसंख्या सुमारे २८ लाख इतकी आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाला शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कायम सतर्क रहावे लागते, ही वस्तुस्थिती आहे. गेल्या दोन वर्षांत कोविड महामारीमुळे सार्वजनिक सण-उत्सव साजरे झाले नाही. मात्र, यंदा सर्व सण-उत्सव निर्बंधमुक्त साजरे होत आहेत. गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी असे उत्सव होणार आहेत. परिणामी, प्रमुख बाजारपेठा, वर्दळीचे चौक, सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणांवर महिलांसह अबालवृद्धांची मोठी गर्दी असते. त्यादृष्टीने सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

सोनसाखळी चोरीच्या प्रमाणात वाढ
सद्यस्थितीला गुन्हेगारी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोनसाखळी चोरी, छेडछाडीचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे पोलिस प्रशासनाकडून नवरात्रोत्सवासह सण- उत्सवाच्या काळात गर्दीच्या ठिकाणी महिला पोलिस, अधिकारी यांची गस्त वाढवणे अपेक्षित आहे. मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून चुकीच्या कृत्यांवर ‘वॉच’ ठेवला पाहिजे. त्यासाठी नियंत्रण कक्षाचीही स्थापना करण्याची आवश्यकता आहे, असेही आमदार लांडगे म्हटले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y27967 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..