महापालिकेच्या बोपखेल शाळेला जागतिक नामांकन इंग्लंडमधील ‘टी फॉर एज्युकेशन’ संस्थेच्या क्रमवारीत तृतीय स्थान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेच्या बोपखेल शाळेला जागतिक नामांकन
इंग्लंडमधील ‘टी फॉर एज्युकेशन’ संस्थेच्या क्रमवारीत तृतीय स्थान
महापालिकेच्या बोपखेल शाळेला जागतिक नामांकन इंग्लंडमधील ‘टी फॉर एज्युकेशन’ संस्थेच्या क्रमवारीत तृतीय स्थान

महापालिकेच्या बोपखेल शाळेला जागतिक नामांकन इंग्लंडमधील ‘टी फॉर एज्युकेशन’ संस्थेच्या क्रमवारीत तृतीय स्थान

sakal_logo
By

पिंपरी, ता. २२ ः समाजाच्या प्रगतीत भरीव योगदान दिल्याबद्दल इंग्लंडमधील ‘टी फॉर एज्युकेशन’ संस्थेच्या ‘जागतिक सर्वोत्तम शाळा पुरस्कार’ नामांकन यादीत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बोपखेल शाळेने तृतीय क्रमांकांवर स्थान मिळवले आहे. जूनमध्ये झालेल्या पहिल्या फेरीत शाळेचे स्थान जागतिक प्रथम दहा शाळांमध्ये होते. आता ‘समुदाय सहयोग’ (कम्युनिटी कोलॅबोरेशन) श्रेणीत तृतीय स्थान पटकावले आहे. अशी कामगिरी करणारी महापालिकेची ती देशातील पहिली शाळा ठरली आहे.
तीन बाजूने लष्करी हद्द आणि एका बाजूने मुळा नदीने वेढलेले गाव म्हणजे पिंपरी-चिंचवडचे बोपखेल उपनगर. गावठाण, वाड्या, वस्त्या अशी रचना. त्यात दापोडीला जोडणारा रस्ता सात वर्षांपूर्वी लष्कराने बंद केलेला. अशी अडचणीची स्थिती असल्याने गावातील महापालिकेच्या शाळेऐवजी खासगी शाळेकडे पालकांचा ओढा. मात्र, येण्या-जाण्याची गैरसोय. त्यावर उपाय म्हणून स्थानिक स्तरावरच मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, महापालिकेच्या शाळेत पालकांनी मुलांना दाखल करावे, शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रशासनाने एक पाऊल उचलले. आकांक्षा फाउंडेशनला शाळा चालवायला दिली. त्यांनी इंग्रजी माध्यमातून धडे द्यायला सुरवात केली. सर्वसुविधा मुलांना मिळू लागल्या. गुणवत्ता वाढली आणि अवघ्या सहा वर्षांच्या वाटचालीत शाळेचा अर्थात ‘पीसीएमसी इंग्लिश मीडियम स्कूल बोपखेल’चा लौकिक जागतिक पातळीवर पोहोचला.

शाळेची वैशिष्ट्ये
- बोपखेलमधील वाड्या, वस्त्या, झोपडपट्टीतील विद्यार्थी
- ज्युनिअर केजीपासून दहावीपर्यंतचे वर्ग
- मुलांना मोफत प्रवेश
- मुलांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग, दरमहा बैठक
- पालक, विद्यार्थी, समाजासाठी आरोग्य जागृती शिबिरे
- ‘प्ले ग्रूप क्लस्टर’मध्ये विद्यार्थ्यांसह अन्य मुलांनाही संधी
- शाळा व्यवस्थापन, विद्या, परिवहन, पोषण आहार समित्यांमध्ये पालकांचा सहभाग

दृष्टिक्षेपात बोपखेल शाळा
विद्यार्थी ः ३१६
शिक्षक ः २५

शिक्षणासह समाजासाठी उत्तम काम करणाऱ्या शाळांमधील विविध उपक्रमांची दखल घेऊन त्यांचा सन्मान ‘टी फॉर एज्युकेशन’ संस्थेद्वारे केला जातो. बोपखेल येथील ‘पीसीएमसी इंग्लिश मीडियम स्कूल’ला ‘कम्युनिटी कोलॅबोरेशन’ अर्थात वस्ती सहभाग श्रेणीत जागतिक स्तरावरील तृतीय मानांकन जाहीर झाले आहे.
- निखिल एकबोटे, समन्वयक, आकांक्षा फाउंडेशन

शिक्षण क्षेत्रातील तज्‍ज्ञांचा समावेश असलेल्या ‘पुनरावलोकन पॅनेल’द्वारे जगभरातील शाळांमधील हजारो अर्जांची फेरतपासणी केल्यावर आकांक्षा पिंपरी-चिंचवड महापालिका इंग्रजी माध्यम बोपखेल शाळेची निवड करण्यात आली. ‘समुदाय सहयोग’ या श्रेणीअंतर्गत त्यांची निवड झाली. या नामांकनामुळे शाळेत उत्साही वातावरण आहे.
- संदीप खोत, उपायुक्त, महापालिका, पिंपरी-चिंचवड
---

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y27995 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..