औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात ‘आर्थिक साक्षरता’वर व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात ‘आर्थिक साक्षरता’वर व्याख्यान
औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात ‘आर्थिक साक्षरता’वर व्याख्यान

औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात ‘आर्थिक साक्षरता’वर व्याख्यान

sakal_logo
By

पिंपरी, ता. २२ ः मराठवाडा मित्र मंडळ औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय व ‘सकाळ’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) यांच्या वतीने ‘आर्थिक साक्षरता’ या विषयावर ग्लोरी प्राइम वेल्थ प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन आगरवाल यांचे व्याख्यान झाले. विद्यार्थ्यांनी कमावते झाल्यानंतर कशाप्रकारे पैशांची गुंतवणूक करावी, सेविंग्ज, म्युचअल फंड यामध्ये गुंतवणूक कशी फायदेशीर आहे याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. अविनाश टेकाडे, अभिजित कारंजे, डॉ. प्रसाद कदम, डॉ. बबिता अग्रवाल, डॉ. रवींद्र बडे, प्रभा भोंग, सुरेखा शिंदे आदी शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन तेजस्विनी थोरात हिने केले. अक्षता जानकर हिने आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा संघ योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रमोद सपकाळ यांनी केले. प्राचार्य एम. जे. पाटील सर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रथमेश वरुडे , धीरज रत्नपारखी, प्रथमेश शिंदे, चैतन्य चोरमाळे, प्रतिज्ञा कांबळे, शुभांगी माने, सूरज चौधरी, प्रणव धनवडे या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y28011 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..