शहरात वाहन परवाना मायक्रोचीपचा तुटवडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरात वाहन परवाना 
मायक्रोचीपचा तुटवडा
शहरात वाहन परवाना मायक्रोचीपचा तुटवडा

शहरात वाहन परवाना मायक्रोचीपचा तुटवडा

sakal_logo
By

पिंपरी, ता. २३ ः शहरात मे महिन्यापासून वाहन परवान्यांचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. वाहन परवान्याचे ‘स्मार्ट कार्ड’ तयार करताना त्याला मायक्रोचीप लावली जाते. ही मायक्रोचीप बनविण्याचे साहित्य युक्रेन, रशिया या देशातून येते. सध्या या दोन देशात युद्ध सुरू असल्याने या साहित्याचा तुटवडा भासत आहे. परिणामी शहरातील सुमारे २१ हजारांहून अधिक वाहन परवाने उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून वितरित करण्यात आलेले नाहीत. आता ही समस्या मिटली असून, नागरिकांना लवकरच घरपोच वाहन परवाने मिळतील, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी देत आहेत. परंतु संबंधितांशी संपर्क साधला असता त्यांना दोन महिन्यांहून अधिक काळ उलटला तरीही वाहन परवाना घरपोच मिळाला नसल्याच्या तक्रारी सुरूच आहेत. नागरिकांच्या वाहन परवान्याचा प्रश्न आता संपलेला आहे. पूर्वीप्रमाणेच वाहन परवाने नागरिकांना लवकरच घरपोच मिळतील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी माहिती दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y28299 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..