लवकरच शिक्षक आॅनलाईन बदली प्रक्रिया शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांची माहिती, इतरही प्रश्‍न सोडवणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लवकरच शिक्षक आॅनलाईन बदली प्रक्रिया
शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांची माहिती, इतरही प्रश्‍न सोडवणार
लवकरच शिक्षक आॅनलाईन बदली प्रक्रिया शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांची माहिती, इतरही प्रश्‍न सोडवणार

लवकरच शिक्षक आॅनलाईन बदली प्रक्रिया शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांची माहिती, इतरही प्रश्‍न सोडवणार

sakal_logo
By

पिंपरी, ता. २३ ः शिक्षणसेवकांना सहशिक्षक पदस्थापना देण्याबरोबरच निवड श्रेणी पात्र काही शिक्षकांची कागदपत्रे पूर्ण करण्याच्या मागणीसाठी प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांच्यासोबत बैठक घेतली. त्यात शिक्षकांच्या बदल्या कधी होणार? यावर चर्चा रंगली. दरम्‍यान, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात शिक्षकांची ऑनलाइन बदली प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती खोत यांनी दिली.

यावेळी शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय येणारे, शिवाजी दौंडकर, संपत पोटघन, रूपाली कड, सतीश पाटील, संतोष गिड्डे, दिलीप थोरात, दिनेश जगताप आदी उपस्थित होते. अध्यक्ष येणारे म्हणाले, ‘‘शिक्षण सेवकांना सहशिक्षक पदस्थापना देण्याची मागणी केली. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात शिक्षकांची ऑनलाइन बदली प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्याकरिता ॲपचा वापर केला जाणार असून बदली पात्र शिक्षक व रिक्त जागा जाहीर केल्या जाणार आहेत. वैद्यकीय अर्ज असलेल्या बदल्या ऑफलाइन पद्धतीने केल्या जाणार असल्‍याचे प्रशासनाने सांगितले. ५ ऑक्टोबर ते जास्तीत जास्त २० ऑक्टोबरपर्यंत मुख्याध्यापक पदोन्नती दिली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी झाली असून, शिक्षकांना पदोन्नती देणार असल्याचे खोत यांनी सांगितले. तसेच वरिष्ठ श्रेणीचा प्रस्ताव संचालक कार्यालयाकडे पाठवला असून, निवड श्रेणी पात्र काही शिक्षकांची कागदपत्रे अपूर्ण असल्याने ती कागदपत्रे दोन दिवसात संबंधित शिक्षकांकडून उपलब्ध करून घेतली जाणार आहेत. या आठवडाअखेरीस प्रस्ताव तयार होईल. पुढील कार्यवाही करिता संचालक कार्यालयांकडे पाठवला जाणार आहे. ३१ मार्च २०२३ पर्यंत वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी पात्र शिक्षकांसाठी परिपत्रक काढण्यात येईल. शिक्षकांना धन्वंतरी योजना लागू करण्याबाबत प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर नवीन आयुक्तांना हा विषय सांगून त्वरित धन्वंतरी योजना लागू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. संगणक गृह कर्ज व वाहन कर्ज यासंदर्भातील माहिती शाळांकडून प्राप्त झाली असून, साधारण ११० लाभ घेतलेल्या शिक्षकांची यादी योग्य त्या माहितीसह दोन दिवसांत प्रशासनाला पाठवली जाणार आहे. त्यामुळे लवकरच प्रशासनाचा निर्णय झाला की कर्ज वाटप करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y28378 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..