आरोग्य अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे नियोजन कोलमडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य अधिकाऱ्यांच्या 
कमतरतेमुळे नियोजन कोलमडले
आरोग्य अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे नियोजन कोलमडले

आरोग्य अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे नियोजन कोलमडले

sakal_logo
By

पिंपरी, ता.२३ ः महापालिकेत सहायक आरोग्य अधिकारी पदावरील कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी भरती करण्यात आली नाही. भरतीअभावी तीन क्षेत्रीय कार्यालयात ही पदे रिक्त आहेत. यामुळे मुख्य आरोग्य निरीक्षकांवर सहायक आरोग्य अधिकारी पदाचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे.
महापालिकेच्या या विभागामार्फत साफसफाई करणे, औषध व धूर फवारणी करणे आदी कामे केली जातात. प्रभागांमध्ये त्याचे नियोजन करण्याची जबाबदारी सहायक आरोग्य अधिकाऱ्यांवर असते. क्षेत्रीय कार्यालयातील तीन सहायक आरोग्य अधिकारी निवृत्त झाले आहेत. मात्र, त्या जागेवर अद्याप नवीन भरती करण्यात आली नाही. गेल्या एका वर्षांपासून सहायक आरोग्य अधिकारी पदाची रिक्त पदे भरण्यात आली नाहीत. त्यामुळे ‘अ’, ‘ड’ आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाला सध्या पूर्णवेळ अधिकारी मिळेनासा झाला आहे. मुख्य आरोग्य निरीक्षकांवर त्या पदाचा भार देण्यात आला आहे. परिणामी, परिसरातील आरोग्याचे प्रश्‍न कधी सुटणार असा सवाल उपस्थित होत आहे.
सहायक आरोग्य अधिकारी पदासाठी आरोग्य निरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचे आहे. मुख्य आरोग्य निरीक्षक म्हणून तीन वर्षे काम केल्यानंतर सहायक आरोग्य अधिकारी पदावर नियुक्ती दिली जाते. सध्या पात्रता धारण केलेले नसल्याने रिक्त पदे भरण्यात आली नाहीत. परिणामी इतरांवर जबाबदारी दिल्याने आरोग्याबाबत निर्णय घेणे अडचणीचे ठरत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y28403 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..