Sun, Jan 29, 2023

अग्रसेन महाराजांची
जयंती उत्साहात
अग्रसेन महाराजांची जयंती उत्साहात
Published on : 25 September 2022, 10:51 am
पिंपरी, ता. २५ : श्री अग्रसेन महाराजांची ५१४६ वी जयंती पिंपळे-सौदागरमधील अग्रक्वीन्स ग्रुपकडून उत्साहात साजरी करण्यात आली. शोभायात्रा महादेव मंदिरापासून पिंपळे सौदागर ते लिनिअर गार्डनपर्यंत झाली. समाजातील सर्व बांधव या ठिकाणी एकत्रित जमले. सर्वांना आरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, रावेत, बालेवाडी भागातील बांधव सहभागी झाले होते.
फोटो ः 93871