रिक्षा चालकांनीच शोधला ‘भाडे आकारणी’वर पर्याय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्षा चालकांनीच शोधला 
‘भाडे आकारणी’वर पर्याय
रिक्षा चालकांनीच शोधला ‘भाडे आकारणी’वर पर्याय

रिक्षा चालकांनीच शोधला ‘भाडे आकारणी’वर पर्याय

sakal_logo
By

पिंपरी, ता. २५ : प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) सप्टेंबर २०२२ पासून रिक्षा मीटर भाडेवाढ लागू केली. परंतु, सर्व रिक्षांचे मीटर बदलण्यास विलंब लागत आहे. त्यामुळे दरवाढ होवूनही रिक्षाचालकांचे उत्पन्न बुडत आहे. मीटर दुरुस्ती व पासिंगही खर्चिक आहे. शिवाय, आरटीओने नवीन दरपत्रकही प्रसारित केलेले नाही. त्यामुळे रिक्षावाला संघटनेने myrickshawala हे ॲप उपलब्ध केले आहे. एक हजारावर रिक्षाचालकांनी ते डाउनलोड केले असून त्यावर मीटरप्रमाणे अंतर, प्रवास, वेळेप्रमाणे भाडे दिसून येत आहे.
डिजिटल मीटर नसताना सर्वत्र मीटर दरवाढ तक्ता आरटीओ प्रसारित करायचे. त्यादिवसापासून रिक्षाचालकांना हक्काची भाडेवाढ मिळायची. परंतु, डिजिटल मीटर आल्याने सॉफ्टवेअर बदलावे लागत आहे. त्याला अधिक वेळ लागत असल्याने रिक्षाचालकांचा व्यवसाय बुडत आहे. शिवाय, रिक्षाचालकांची संख्या आणि तुलनेने तोकड्या संख्येने असणारे मीटर दुरुस्ती व्यवसायिक व परिवहन विभागाचे अधिकारी यामुळे यंत्रणेवर बराच ताण येत आहे. ही बाब परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी पुण्यासाठी नवीन दर अपलोड करण्याचा आदेश आरटीओला दिला. परंतु, अद्याप कार्यवाही झालेली नाही. १४ सप्टेंबर रोजी अधिकाऱ्यांनी बारकोड आधारित दर वापरण्यास परवानगी देत असल्याचे निवेदन काढले. मात्र, अद्याप बारकोड सहित कुठल्याही प्रकारचे दर प्रसारित केले नाहीत. यामुळे रिक्षाचालकांचे नुकसान होत आहे, असे बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी सांगितले.
--