Mon, Feb 6, 2023

भटकी कुत्री, मांजरांना
आज ॲंटिरेबिज लस
भटकी कुत्री, मांजरांना आज ॲंटिरेबिज लस
Published on : 27 September 2022, 7:43 am
पिंपरी, ता. २७ ः रेबीज मुक्त शहर करण्याच्या उद्देशाने महापालिका आणि शहरातील खासगी पशुवैद्यक तज्ज्ञांच्या संयुक्त विद्यमाने भटकी कुत्री, मांजर यांच्यासाठी मोफत अँटिरेबिज लसीकरण शिबिराचे आयोजन केले आहे. जागतिक रेबीज दिनानिमित्त प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (ता. २८) महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत नेहरूनगर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात (अॅनिमल शेल्टर) मोफत अँटी रेबीज लसीकरण शिबिर होईल. त्याचा लाभ शहरातील प्राणीमित्र, स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त श्वानांचे आणि मांजरांचे लसीकरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पशुवैद्यकीय विभागाचे उपआयुक्त सचिन ढोले यांनी केले आहे. तसेच, नेहरूनगर प्राणी रुग्णालयात दररोज मोफत निर्बिजीकरण शस्त्रक्रिया शिबिरही होणार आहे.