पंचगव्य शिबिरात १५० गोसेवकांचा सहभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंचगव्य शिबिरात 
१५० गोसेवकांचा सहभाग
पंचगव्य शिबिरात १५० गोसेवकांचा सहभाग

पंचगव्य शिबिरात १५० गोसेवकांचा सहभाग

sakal_logo
By

पिंपरी, ता. २७ : पंचगव्य सहावे प्रशिक्षण शिबिर २५ सप्टेंबर रोजी विनामूल्य पार पडले. सकळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत संपूर्ण दिवस कार्यशाळेला महाराष्ट्रातील विविध भागातून साधारण १५० गोसेवकांनी सहभाग घेतला. गोउत्पादन प्रशिक्षक प्रदीप शेळके यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

शिबीरात पंचगव्य साबण, फिनाईल तक्रारीष्ट, गोमय-शाम्पू, चंदन धूप, गोमय पणती व दिवा, नारी संजीवनी, च्यवनप्राश या गोउत्पादनाची साहित्य बनवण्याची कृती व प्रात्यक्षिके हे सखोल ज्ञान देण्यात आले. कॅन्सरची माहिती लक्षणे पथ्ये, उपचार यांची माहिती दिली गेली. प्रशिक्षणस्थळी प्रदर्शन गोउत्पादने, सेंद्रिय भाजीपाला, लाकडी खेळणी, गांडूळखत तसेच टेरेस गार्डन आणि भाजीपाला उत्पादने, कंपोस्ट खते इत्यादीचे स्टॉल देखील विविध गोशाळांनी लावले होते. प्रशिक्षण दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आयोजित करण्यात येतात. गोसेवा समिती महाराष्ट्र राज्य व पांजरपोळ सेवा ट्रस्ट यांच्या योगदानातून गोसेवक दत्तुसिंग तोवर, अॅड. प्रभाकर तावरे, दत्तात्रय मारणे, संतोष सुरवसे, सुनील ननवरे, नीलेश देशमुख यांचे सहकार्य लाभले.