
"लहरायेगा तिरंगा" या गीताद्वारे बालकामगार, शाळाबाह्य मुलांच्या जीवनावर टाकला प्रकाश!
पिंपरी, ता.२३ : ‘लहरायेगा तिरंगा’ या गीताद्वारे बालकामगार, शालाबाह्य मुलांच्या दैनंदिन जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हे गाणे प्रदर्शित केले आहे. या सामाजिक विषयावर आधारित असलेल्या गाण्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून हे गाणं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
शहरांमध्ये अनेक ठिकाणी काम करणारे बालमजूर व शालाबाह्य मुले शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना कशाप्रकारे मुख्य प्रवाहात आण्यात येते. त्या मुलांची देशाप्रती असलेली देशभक्ती दाखवण्यात आले आहे. बालमजूर कायदा व शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी या मुख्य उद्दिष्टाने या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. याचे अनावरण पहिले पॅरालिंपिंग सुवर्णपदक विजेते खेळाडू मुरलीकांत पेटकर, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांच्या हस्ते झाले. गीत लेखन व दिग्दर्शन सनदी लेखापाल अरविंद भोसले यांनी केले आहे.
गाण्यात पिंपरीतील नेहरूनगर विठ्ठलनगर पुनर्वसन झोपडपट्टीतील मुलांनी प्रथमच अभिनय केला आहे. बाल कलाकार आशिष नाटेकर याने मुख्य भूमिका साकारली आहे. सह बालकलाकार म्हणून गौरव कदम, ओवी दैठे, कुणाल गायकवाड, वेदांत डोंगरे, कुमार अवचर, संतोष सगुंडे, कार्तिक जेगरी, अविनाश नाणेकर यांनी केले तर अभिनेता रोहित पवार व किरण कांबळे यांनी काम केले आहे.