Tue, June 6, 2023

सराईत गुन्हेगारावर मोका कारवाई
सराईत गुन्हेगारावर मोका कारवाई
Published on : 28 January 2023, 9:07 am
पिंपरी, ता. २८ : हिंजवडी, वाकड परिसरातील सराईत गुन्हेगार अनिल मोहिते याच्यावर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (मोका) कारवाई केली. त्याच्यावर हिंजवडी, वाकड, लोणी काळभोर, यवत, डेक्कन या ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. जमिनीच्या वादातून अनिल याने सख्या चुलत भावाच्या हत्येची सुपारी दिली होती. मात्र, त्यापूर्वीच सुपारी दिलेल्या आरोपींनी पिंपरीत अंदाधुंद गोळीबार केल्याने ते पोलिसांच्या हाती लागले. चौकशी दरम्यान अनिलने त्याच्या भावाच्या हत्येची सुपारी दिल्याचे समोर आले. यासह त्याच्यावर इतरही गंभीर गुन्हे दाखल असल्याने पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोका अंतर्गत कारवाई केली.