खान्देश मराठा मंडळाचा ३६ वा वार्षिक स्नेहमेळावा उत्साहात साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खान्देश मराठा मंडळाचा ३६ वा
 वार्षिक स्नेहमेळावा उत्साहात साजरा
खान्देश मराठा मंडळाचा ३६ वा वार्षिक स्नेहमेळावा उत्साहात साजरा

खान्देश मराठा मंडळाचा ३६ वा वार्षिक स्नेहमेळावा उत्साहात साजरा

sakal_logo
By

पिंपरी, ता. २८ : निगडी येथे खान्देश मराठा मंडळाचा २६ जानेवारी रोजी ३६ वा वार्षिक स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात साजरा झाला. मंडळाचे अध्यक्ष मधुकर सोनू पगार व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते खानदेशातील लोकप्रिय आणि सामाजिक, शैक्षणिक, उद्योग आदी क्षेत्रात समाजाभिमुख कार्य करणाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.
खान्देश भूषण पुरस्काराने डॉ. प्राचार्य दिलीप शिंदे, फकीरा दगा पाटील यांना सन्मानित करण्यात आले. खान्देश उद्योजक पुरस्कार प्रकाश भीमराव पाटील आणि दीपक काशिनाथ पाटील यांना दिला. गौरव पुरस्कारामध्ये विशेष कार्य निवड झाल्याबद्दल महिला आणि बालविकास महाराष्ट्र राज्याचे सहआयुक्त रवींद्र शाळिग्राम पाटील, आयएएस अभिजित राजेंद्र पाटील, आयपीएस देवराज मनिष पाटील, करण धर्मेंद्र पाटील, भिला सोनू पाटील यांना सन्मानित करण्यात आले. हिंदी साहित्य लेखक, गझलकार प्रा. संजय पवार आणि नेहा पवार यांना सन्मानित करण्यात आले. इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास कृषी संचालक युवराज साळुंखे, उद्योजक हंबीरराव चव्हाण, अधीक्षक बांधकाम विभाग अरविंद सूर्यवंशी, डॉ. तुषार शेवाळे हे विशेष निमंत्रित होते. कार्यकारिणी कमिटीतील उपाध्यक्ष एस.आर.पाटील, सचिव प्रदीप दामोदर शिंदे, खजिनदार भास्कर दगडू पाटील, सहसचिव अनिल फकिरा सावंत, हिशेबनीस जयवंत विनायक सिसोदे, कृष्णराव चैत्राम अहिरराव, मिलिंद भास्कर पाटील पाटील, संजय भागवत पाटील, सुरेश भगवान पाटील, मार्गदर्शक कमिटीतील बी.के. पाटील, संतोष दामोदर पाटील, बी.डी. पाटील, माधव बाबूराव पवार, गंगाराम सखाराम पाटील उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात खान्देश मराठा मंडळाच्या अध्यक्षांनी मंडळाच्या सर्वांगीण विकासासाठी समाजातील होतकरू कार्यकर्त्यांना मंडळासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक प्रदीप दामोदर शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन अनिल फकीरा सावंत यांनी केले. मयत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बी.के. पाटील यांनी आभार मानले.