चिंचवड ज्येष्ठ नागरिक संघाचा ३१वा वर्धापनदिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिंचवड ज्येष्ठ नागरिक संघाचा
३१वा वर्धापनदिन उत्साहात
चिंचवड ज्येष्ठ नागरिक संघाचा ३१वा वर्धापनदिन उत्साहात

चिंचवड ज्येष्ठ नागरिक संघाचा ३१वा वर्धापनदिन उत्साहात

sakal_logo
By

पिंपरी, ता. २८ ः ‘‘सकारात्मकता मानवी जीवन सुंदर करते,’’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले यांनी व्यक्त केले. चिंचवडगाव विरंगुळा केंद्रात ज्येष्ठ नागरिक संघ चिंचवड या संस्थेच्या ३१व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात झाले.
माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, संघाचे अध्यक्ष रमेश इनामदार, उपाध्यक्ष चंद्रकांत कोष्टी, कार्यवाह राजाराम गावडे, सहकार्यवाह भिवाजी गावडे, कोषाध्यक्ष अरविंद जोशी, सहकोषाध्यक्ष सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते. गणेशप्रतिमा व क्रांतिवीर चापेकर समूहशिल्पाचे पूजन केले. मंगला दळवी व रत्नप्रभा खोत यांनी त्रिवार ओंकार व शांतिमंत्राचे पठण केले. संघाच्या ‘जिव्हाळा’ वार्षिक अंकाचे प्रकाशन झाले. दिलीप तांबोळकर यांनी शंखनाद केला. अंकाचे संपादक नंदकुमार मुरडे यांनी अंतरंग उलगडून सांगितले. वैवाहिक जीवनाची पन्नास वर्षे पूर्ण करणाऱ्या दांपत्यांना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित केले. गोपाळ भसे यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. महिलांच्या स्पर्धा व हळदीकुंकू समारंभ झाला. तानाजीनगर येथील गजानन महाराज मंदिरात प्रिया जोग व सहकाऱ्यांनी सामुदायिक अथर्वशीर्ष पठण केले. महिलांचे विष्णुसहस्रनाम, सभासद वाढदिवस सत्कार, विविध गुणदर्शन व बक्षीस वितरण झाले. उषा गर्भे यांनी विजेत्यांची नावे घोषित केली.