
क्रिकेट स्पर्धेमध्ये बजाज ऑटो विजयी
पिंपरी, ता. २ ः औद्योगिक क्रीडा संघटनेने आयोजित केलेल्या मर्यादित २० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आज टाटा मोटर्स ‘अ’, बजाज ऑटो आकुर्डी, ऍटसलास कॉपको, एचइएफ संघानी प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळविला.
सामन्याचे निकाल पुढीलप्रमाणे ः सामन्यांमध्ये सकाळच्या सत्रामध्ये बजाज ऑटो आकुर्डीने एक गडी राखून महेंद्र सीएलपीएल वर विजय मिळविला.
सकाळच्या सत्रामध्ये बजाज ऑटोच्या आकुर्डीच्या मैदानावर महेंद्र सीएलपीएलने २० षटकांमध्ये ११४ धावा ८ गड्यांच्या मोबदल्यात केल्या. निखिल देऊळकर २७, तुषार तांबेने २१, प्रमोद उगले १६/२. नंतर फलंदाजी करताना बजाज ऑटो आकुर्डीने ११७ धावा ९ गडी बाद करून केल्या. अक्षय भिलारे २९, संग्राम सदरे २५, रमेश बचाटे २२, तुषार तांबे २३/२, विनय १७/२, सतीश पवार १३/३. बजाज ऑटो आकुर्डीने एक गडी राखून महेंद्र सीएलपीएल वर विजय मिळविला.
दुपारच्या सत्रामध्ये पॉस्कोने प्रथम फलंदाजी करताना १४८ धावा सर्व बाद केल्या. अनिल रंधाळे ४३, स्वप्नील कदम ३१, सनराइज् दिलीप महाली २३. अरबाज खान २२/४, सूर्यकांत सोंडकर ११/३ तर ऍटलास कॉपको ने १४९ धावा ४ गडी गमावून केल्या. रंजन कामातगी ४०, मनोज पी नाबाद ६०, सुमीत शिरसाट १९, आशिष खाडे २६/३. ऍटलास कॉपकोने सहा गडी राखून विजय मिळविला. सकाळच्या सत्रामध्ये टाटा मोटर्स क्रीडांगणावर टीटीएल आणि एचइएफ यांच्यात झालेल्या सामन्यांमध्ये एचइएफ ने १६ धावांनी विजय मिळविला.
टीटीएल सर्व बाद १२९ धावा, दीपक जीनवल २२, कुणाल काळमेघ ३७, देवेंद्र पंडित २१, किरण गायकवाड १६/४ सुशांत जगदाळे १८/२ तर एचइएफ १४५/६. संदीप भगत २२, श्रीकांत कोळपे ३७, कोडपे ३७, राहुल दुर्गुळे २७ एचइएफ फॅक्टरी १६ धावांनी विजयी झाले. दुपारच्या सत्रामध्ये टाटा मोटर्स ए ने शिवमुद्रा टूलिंग वर दहा गडी राखून विजय मिळविला. शिवमुद्रा टुलिंग ८० सर्व बाद. किरण दुपरगडे १७, अविनाश तिकोने ६/२, सुशील बेंद्रे ११/३ तर टाटा मोटर्स ए ८३ नाबाद प्रवीण कांबळे २८, पंकज वाघचौरे ४८.