
औद्योगिक क्रीडा संघटनेची ५९ वी मर्यादित वीस षटकांच्या क्रिकेट स्पर्धा
औद्योगिक क्रीडा संघटनेतर्फे
वीस षटकांच्या क्रिकेट स्पर्धा
पिंपरी, ता. ६ ः औद्योगिक क्रीडा संघटनेच्या ५९ व्या मर्यादित २० षटकांच्या बजाज ऑटोच्या क्रीडांगणावर झालेल्या सामन्यांमध्ये स्कोडा ओक्सवॅगन व फॉरेशिया या संघांनी आपल्या प्रतिस्पर्धेवर विजय मिळविला.
सकाळच्या सत्रामध्ये झालेल्या सामन्यांमध्ये स्कोडा ओक्सवॅगन संघाने २० षटकांत २३३ धावा पाच गड्यांच्या मोबदल्यात करत धावांचा डोंगर उभा केला. त्यास उत्तर देताना शिवरुद्र टुलिंग संघाने सर्व बाद १३० धावा केल्या स्कोडा ओक्सवॅगन २३३ धावा ५ बाद २० षटकात, देवमन सांगळे ७६, वैभव सावंत ४६, प्रमोद ओझरकर ४१ विनायक साळुंखे ३१, समाधान पाटोळे ४१/२,किरण दुपारगडे ६८/२. शिवरुद्र टोलिंग १३० सर्व बाद स्वप्निल गायकवाड ५८,मनोज शिंदे २०/५, सोमनाथ विश्वासे ३०/२.
स्कोडा वोक्सवॅगनने हा सामना १०३ धावांनी जिंकला. दुपारच्या सत्रामध्ये फॉरेशियाने पहिली फलंदाजी करताना वीस षटकांमध्ये १८९ धावा ६ बळी देऊन केल्या ओंकार डोरगे ३२, दत्ता पाटील ३७,रुपेश साळुंके ५६, निरंजन भोसले ३४, अमोल सुपे ४०/२ तर ऑर्डिनन्स फॅक्टरीने नंतर फलंदाजी करताना १६१ धावा ७ गाड्यांच्या मोबदल्यात केल्या. सर्जेराव टाकळकर ३०, ए पवार ३७, रवी कोतवाल २५, अभिनंदन पी ३४/३, निरंजन भोसले १७/२. फॉरेशिया २८ धावांनी विजयी झाली.