धावण्याच्या स्पर्धेमध्ये
प्रांजल बच्चेला सुवर्ण

धावण्याच्या स्पर्धेमध्ये प्रांजल बच्चेला सुवर्ण

लोणावळा, ता. १ ः येथील प्रांजल विनोद बच्चे हिने राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत १९ वर्षाखालील गटात ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले.
म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्यावतीने शालेय मैदानी स्पर्धा पार पडल्या. येथील अॅथलेटिक्सच्या ट्रॅकवर सुरू झालेल्या या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत मंगळवारी १९ वर्षाखालील गटात प्रांजल बच्चे हिने ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत २.२१ मिनिटे वेळ नोंदवून प्रथम क्रमांकांसह सुवर्णपदक जिंकले. याचबरोबरीने तिने सोमवारी ४०० मीटर शर्यतीत ५९.२ सेकंद वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकले होते. प्रांजल ही तुंगार्ली येथील डॉन बास्को हायस्कूलमध्ये बारावीत शिक्षण घेत आहे. ती सध्या कै. गजानन पाटील रेसिंग फिटनेस क्लब येथे प्रशिक्षक दत्तात्रेय झोडगे व श्याम दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. तिने यापूर्वी आंध्र प्रदेश, दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला होता. प्रांजलने राज्यस्तरीय स्पर्धेत दुहेरी यश संपादन केल्याने तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


फोटो ः २३४१
म्हाळुंगे बालेवाडी ः राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत लोणावळ्यातील प्रांजल बच्चे हिने (मध्यभागी) सुवर्णपदक पटकावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com