पालिकेतील ४० अधिकाऱ्यांच्या 
पदोन्नतीची माहिती पाठवा

पालिकेतील ४० अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची माहिती पाठवा

पिंपरी, ता. १० ः महापालिका सेवाप्रवेश नियमामध्ये पदोन्नतीबाबत सरकारची पुर्वमंजुरी आवश्यक आहे. तरीही ४० अधिकाऱ्यांना गट अ संवर्गात पदोन्नती दिली आहे. त्याबाबतची सविस्तर माहिती राज्य सरकारने मागवली आहे. चौकशीत काही अधिकाऱ्यांची पदोन्नती अडचणीत येऊ शकते.
गेल्या दोन वर्षात महापालिका सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार वेगवेगळ्या विभागातील ४० अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. त्यातील आठ अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत. या सर्वांची माहिती सरकारने मागवली आहे. त्याबाबतच्या पत्रात, सरकारचे कक्ष अधिकारी शिवाजी चव्हाण यांनी म्हटले आहे की, सेवाप्रवेश नियमामध्ये पदोन्नतीबाबत सरकारची पूर्वमंजुरी आवश्यक राहील, अशी तरतूद असताना सरकारच्या पूर्वमंजुरीशिवाय पदोन्नती देण्याची कारणमीमांसा; पदोन्नतीसभा व महापालिका सभेचा प्रस्ताव; मंजुरीच्या ठरावाची प्रत; पदोन्नती समिती सभेचे इतिवृत्त; गोपनीय अहवाल, सेवाप्रवेश नियमातील अहर्ता, २९ जणांच्या कागदपत्रांच्या प्रती; पदोन्नती समितीची कार्यवाही अशी माहिती सरकारने मागवली आहे. यात नऊ ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी; नऊ सहशहर अभियंता; सात कार्यकारी अभियंता; आरोग्य कार्यकारी अधिकारी, चिफ केमिस्ट, वैद्यकीय उपअधीक्षक व सहायक संचालक नगररचना, मुख्य उद्यान अधिक्षक, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रत्येकी दोन; मुख्य सुरक्षा अधिकारी, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी, आरोग्य कार्यकारी अधिकारी, सहआयुक्त, विशेष अधिकारी प्रत्येक एक अशा पदांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com