दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक व्याख्यानमालेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 
ज्ञानवर्धक व्याख्यानमालेचे आयोजन
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक व्याख्यानमालेचे आयोजन

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक व्याख्यानमालेचे आयोजन

sakal_logo
By

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. ११ : श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शालेय समिती अध्यक्षा रजनीगंधा खांडगे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक इंग्रजी भाषातज्ज्ञ सुरेश पांडे, मुख्याध्यापिका शमशाद शेख, रेणू शर्मा आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. इंग्रजी, मराठी, हिंदी या विषयाचा पेपर लिहिताना कोणत्या चुका टाळाव्यात; कोणत्या पद्धतीने पेपर लेखन करावे, शब्दांचे मूळ उच्चार, व्याकरण यांचे वैशिष्ट्यपूर्ण धडे तसेच मनाची एकाग्रता वाढविण्याचे सोपे उपाय, युक्त्या, विचारपद्धतीचा विकास अतिशय सोप्या उदाहरणातून पांडे यांनी विद्यार्थ्यांना दिले.
ज्ञानवर्धक व्याख्यानातून विद्यार्थ्यांनी भाषिक विकास साधावा, तसेच सोप्या पद्धतीचा अवलंब करून वेळेचे नियोजन करून पेपर सोडवावा आणि यश प्राप्त करावे, असे खांडगे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे या उपक्रमाचे श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, उपाध्यक्ष दादासाहेब उऱ्हे, सचिव मिलिंद शेलार, कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी कौतुक केले. सूत्रसंचालन सोनिका कांबळे व विजयमाला गायकवाड यांनी केले.