
बसथांबा शेड तुटल्याने सोमाटणेत प्रवाशांचे हाल
सोमाटणे, ता. १२ ः येथील बसथांबा शेड तुटल्याने भर उन्हातच प्रवाशांवर लहान मुलांसह बसची प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे.
पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे येथील पूर्वीचा बसथांबा लोकप्रतिनिधींच्या अनुदानातून बांधण्यात आलेला होता. त्याची नियमित डागडुजी न केल्याने ऊन, वारा व पावसाने गेल्या दोन वर्षापासून बसथांब्याचे शेड तुटले असून छताचा पडदा पूर्ण फाटला आहे. सध्या बसथांबा परिसरात उन्हातच प्रवाशांना बसची वाट पाहत थांबावे लागत आहे. यातच गेल्या आठ दिवसांपासून उन्हाची तीव्रता प्रचंड वाढल्याने प्रवाशांसह, लहान मुलांचे अतोनात हाल होत आहे. या बसथांबा शेजारीच खुली सांडपाणी वाहिनी असल्याने त्यातून वाहणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्याचाही त्रास सर्वांना सहन करावा लागतो आहे. बस थांब्यावरील ऊन व थांब्यासमोरून वाहणाऱ्या
दुर्गंधीयुक्त खुली सांडपाणी वाहिनीमुळे लहान मुले आजारी पडण्याचा धोका अधिक असल्याने पीएमपीएमएलने तातडीने बसथांबा निवारा शेडची दुरुस्ती करण्याची प्रवाशांनी मागणी केली आहे.
PNE23T24300
Smt१२Sf१,२,३