Sat, June 10, 2023

दुकानाचे शटर उचकटून सव्वादोन लाखांचा माल चोरला
दुकानाचे शटर उचकटून सव्वादोन लाखांचा माल चोरला
Published on : 12 February 2023, 1:40 am
पिंपरी, ता. १२ : दुकानाचे शटर उचकटून आत शिरलेल्या चोरट्याने सव्वा दोन लाखांचा माल चोरला. ही घटना भोसरी येथे घडली. महेंद्र कालिदास कांकरिया (रा. भवानी पेठ, टिंबर मार्केट) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे गुळवेवस्ती येथे स्टील ट्रेडिंगचे दुकान आहे. या दुकानाचे शटर उचकटून चोरटा आत शिरला. दुकानातील स्टील, कॉपर, ब्रासचे रॉड, बुश, प्लेट व सीसीटीव्हीचा डीव्हीआर असा एकूण दोन लाख १५ हजार रुपये किमतीचा माल चोरला.