मतदान यंत्राची 
पुरवणी तपासणी

मतदान यंत्राची पुरवणी तपासणी

पिंपरी, ता. १२ : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या भोसरी येथील गोदामात ७०० बॅलेट युनिटची प्रथमस्तरीय पुरवणी तपासणी रविवारपासून सुरू केली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले, समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी सुभाष बागडे, तहसीलदार प्रशांत पिसाळ आदी उपस्थित होते. कसबा मतदारसंघात १६ आणि चिंचवड मतदारसंघात २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दोन्ही मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी दोन बॅलेट युनिटची आवश्यकता असेल. त्यामुळे निवडणूक आयोगाने कोल्हापूर जिल्ह्यातील ७०० अतिरिक्त बॅलेट युनिट पोटनिवडणुकीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. त्यांची प्रथमस्तरीय तपासणी सुरू केली. सोमवारी (ता. १३) तपासणी पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेने दिली.
---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com