प्राधिकरणात रंगला
 कथक आविष्कार

प्राधिकरणात रंगला कथक आविष्कार

पिंपरी, ता. १३ ः भारतरत्न लता मंगेशकर यांचा प्रथम स्मृतिदिन, दास नवमी आणि मराठी भाषा दिन यांचे औचित्य साधून, निगडी प्राधिकरणातील मनोहर वाढोकर सभागृहात कथक नृत्याविष्कार रंगला. निमित्त होते, शब्दरंग कला साहित्य कट्टा यांच्यातर्फे आयोजित ‘इये मराठीचीये नगरी’ कार्यक्रमाचे. नूपुर नृत्यालयाच्या संचालिका डॉ. सुमेधा गाडेकर यांनी त्यांच्या ४५ शिष्यांसह नृत्याविष्कार सादर केला. गणेश वंदनेने प्रारंभ झाला. मनाचे श्लोक सादर केले. ‘मोगरा फुलला’, ‘रंगा येई’, ‘ये आई मला पावसात जाऊ दे’, ‘घन घन माला नभी दाटल्या’, ‘ऋतू हिरवा’, कुसुमाग्रज यांच्या ‘ओळखलंत का सर मला’, पावनखिंड चित्रपटातील ‘शिवराय’, ‘घेई छंद मकरंद’ हे नाट्यपद, ‘माउली माउली’ या गाण्यांवर नृत्य सादर झाली. माजी नगरसेवक शर्मिला बाबर, मधुश्री कला आविष्कारच्या माधुरी ओक, शब्दरंग कला साहित्य कट्टाचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी आदी उपस्थित होते. संयोजक ज्योती कानेटकर यांनी केले.
--
फोटोः 24502

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com