शंभर कलासाधकांची कला सादर स्मृतीरंग प्रदर्शन ः रविवारपर्यंत खुले राहणार सादर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शंभर कलासाधकांची कला सादर
स्मृतीरंग प्रदर्शन ः रविवारपर्यंत खुले राहणार सादर
शंभर कलासाधकांची कला सादर स्मृतीरंग प्रदर्शन ः रविवारपर्यंत खुले राहणार सादर

शंभर कलासाधकांची कला सादर स्मृतीरंग प्रदर्शन ः रविवारपर्यंत खुले राहणार सादर

sakal_logo
By

पिंपरी, ता. १५ : अमृत महोत्सवानिमित्त संस्कार भारती पिंपरी-चिंचवड समितीच्या चित्रशिल्पहस्त कला विभागाकडून स्वातंत्र्याच्या यज्ञात आहुती दिलेल्या क्रांतिकारकांच्या स्मृतींना रंगाद्वारे उजळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्मृतीरंग प्रदर्शनाच्या २१ व्या पुष्पाअंतर्गत ७५ कलासाधकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे १०० पेक्षा जास्त कलासाधकांनी कला सादर केली.

या मालिकेतील शेवटच्या म्हणजेच २१ व्या प्रदर्शनाचे उद्घाटन १४ फेब्रुवारी २०२३ रोजी संस्कार भारतीच्या पश्चिम प्रांताचे चित्रशिल्पहस्तकला विभाग प्रमुख व सुप्रसिध्द चित्रकार कुडलय्या हिरेमठ यांच्या हस्ते झाले. भारतमाता प्रतिमा पूजन, दीपप्रज्वलन व काही मिनिटांत जलरंगात चित्र रेखाटले.

पद्मश्री गिरीश प्रभुणे, सतीश कुलकर्णी, श्रीपाद चिलकवाड, संजय कुंभार, आनंद गजलमल, शिवराम हाके, शांताराम पांडे, सुनीता आचार्य, सुहास एकबोटे, सुरेश वरगंटीवार, श्याम साठे, राजेंद्र सूर्यवंशी, वसुधा कुलकर्णी, जितेंद्र सुतार, विनोद ऐलारपुरकर, डॉ. राहुल वेलदोडे, डॉ.वर्षा सोनकर या चित्रकारांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

हे प्रदर्शन रविवारी (ता. १९) सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत सर्वांसाठी पी. एन्. गाडगीळ कला दालन, चापेकर चौक, चिंचवडगाव येथे खुले आहे. प्रदर्शनात रमा घारे यांची लघुशैलीतील चित्रे प्रदर्शित केली आहेत. प्रफुल्ल भिष्णूरकर यांनी वेगळ्या माध्यमातील पेपर कोलाज, सुतचित्रे, पेस्टल, दगडी पाटीवरील कोरीवकाम कलाकृती सादर केल्या आहेत. लीना आढाव यांनी अंजठा लेण्यातील चित्रशैलीवर आधारित व काही अमूर्त ऑईल पेंटिंग्ज प्रदर्शित केली आहेत.

पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी कलाकारांनी भीमबेटका येथील गुंफाचित्रांचा कलाकारांनी अभ्यास करावा व आपल्या संस्कृतीचे व कलेचे जतन व संवर्धन करावे, असे सांगितले. श्रीपाद चिलकवाड म्हणाले, ‘‘सतत काम करत राहणे हाच परिपूर्ण कौशल्याचा आणि यशाचा मार्ग आहे.’’

समितीच्या सचिव लीना आढाव, उपाध्यक्ष प्रफुल्ल भिष्णूरकर, चित्रशिल्पहस्तकला विधा संयोजक धीरज दीक्षित, सहसंयोजक रमेश खडबडे यांनी परिश्रम घेतले.
अलका जोशी यांनी सूत्रसंचालन केले. भाग्येश अवधानी यांनी आभार मानले.