Thur, June 1, 2023

चांदगुडे स्मृतिदिनानिमित्त
‘सावली’मध्ये अन्नदान
चांदगुडे स्मृतिदिनानिमित्त ‘सावली’मध्ये अन्नदान
Published on : 15 February 2023, 10:53 am
पिंपरी, ता. १५ : कै. कैलासभाऊ चांदगुडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवारी (ता. १४) पिंपरी कॅम्पातील सावली निवारा केंद्रात अन्नदान करण्यात आले. शहरात फिरणाऱ्या विकलांग, विमनस्क तसेच बेघरांसाठी कार्य करणाऱ्या पिंपरी कॅम्प येथील सावली निवारा केंद्रातील १७ महिला आणि ३८ पुरुषांना आधार महिला मंडळ अध्यक्षा सुप्रिया चांदगुडे व कुटुंबातील सदस्य संदीप चांदगुडे, श्रेया चांदगुडे, शिवानी चांदगुडे, स्नेहल चांदगुडे यांनी अन्नदान केले.
यावेळी संदीप चव्हाण, गणेश कानूरकर, किशोर पवार, शुभम चौधरी यांच्यासह सावली निवारा केंद्राचे स्वयंसेवक गौतम थोरात, सचिन बोधनकर, अमोल भाट, मिलिंद माळी, अग्निश फ्रान्सिस, सुनीता श्रीनाथ, लक्ष्मी वायकर, उमा भंडारी उपस्थित होते.
फोटो ः 24877