Sun, May 28, 2023

आपतकालीन बचावाचे
विद्यार्थ्यांना धडे
आपतकालीन बचावाचे विद्यार्थ्यांना धडे
Published on : 15 February 2023, 2:03 am
पिंपरी, ता. १५ ः महापालिका, वायसीएम रुग्णालय, स्मार्ट सिटी व अखिल भारतीय भूलतज्ज्ञ संघटना (सोसायटी ऑफ ऍनेस्थेसियोलॉजिस्ट) यांच्यातर्फे चिंचवड येथील श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना हृदयविकार, विजेचा झटका, अपघात अशा आपत्कालीन परिस्थितीत व्यक्तीचे प्राण कसे वाचवायचे, याबाबत प्रशिक्षण दिले. भूलतज्ज्ञ डॉ. उज्ज्वला अंदुरकर, डॉ. मनीषा सूर्यवंशी, डॉ. वैशाली सापटणेकर यांनी प्रशिक्षण देवून अवयव दानाबाबत मार्गदर्शन केले. प्राचार्य विक्रम काळे, विभागप्रमुख मीना मेरुकर, बिनीश सुरंदरन, जस्टीन मॅथ्थेव्ह, किरण लवटे आदी उपस्थित होते.
---