चिंचवड मतदारसंघामध्ये भाजपला मनसेचा पाठिंबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिंचवड मतदारसंघामध्ये
भाजपला मनसेचा पाठिंबा
चिंचवड मतदारसंघामध्ये भाजपला मनसेचा पाठिंबा

चिंचवड मतदारसंघामध्ये भाजपला मनसेचा पाठिंबा

sakal_logo
By

पिंपरी, ता. १५ : चिंचवड मतदारसंघाच्या पोट निवडणुकीमध्ये भाजपला मनसे नेते अनिल शिदोरे व राजेंद्र ऊर्फ बाबू वागस्कर यांनी बुधवारी (ता. १५) पाठिंबा जाहीर केला.
पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, प्रवक्ते एकनाथ पवार, अनुप मोरे, आरपीआयचे शहराध्यक्ष स्वप्नील कांबळे, मनसेचे नेते वागस्कर, शिदोरे, प्रभारी किशोर शिंदे, मनसे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले पिंपरीतील मनसे कार्यालयात उपस्थित होते. यावेळी चर्चा करून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने चिंचवड विधानसभेसाठी भाजपला पाठिंबा देण्यात आला.
सध्या तरी पक्षाचे कार्यकर्ते प्रचारात सहभागी होणार नाहीत. पुढील नियोजन राज ठाकरे यांच्या आदेशाने केले जाईल, असे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी सांगितले.