Sun, April 2, 2023

संत निरंकारी फाउंडेशनतर्फे
रविवारी रक्तदान शिबीराचे आयोजन
संत निरंकारी फाउंडेशनतर्फे रविवारी रक्तदान शिबीराचे आयोजन
Published on : 16 February 2023, 8:47 am
पिंपरी, ता. १६ : पुणे झोन मधील पिंपरी सेक्टर अंतर्गत वाल्हेकरवाडी शाखा येथे संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनद्वारा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संत निरंकारी सत्संग भवन, वाल्हेकरवाडी या ठिकाणी (ता.१९) रविवारी सकाळी ९ ते ५ या वेळेत करण्यात आले आहे. या मानवतेच्या कार्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन संत निरंकारी मिशनचे वाल्हेकरवाडी शाखेचे प्रमुख रामचंद्र लाड यांनी केले आहे.